हाॅटेल सेंटर पाॅईंटमध्ये रंगला पुरस्कार सोहळा..
शिरगांव | संतोष साळसकर : एका दैनिकातर्फे घेतलेल्या पां. वा.गाडगीळ राज्यस्तरीय आर्थिक – विकासात्मक लेखन पत्रकारिता स्पर्धेत श्री प्रमोद जाधव, उप आयुकत समाज कल्याण ,सिंधुदुर्ग यांनी एका दैनिकात लिहिलेल्या ‘जलाशये निर्मावी नानाविध’ या लेखास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार खासदार संजय राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदरचा कार्यक्रम हा हॉटेल सेंटर पॉईंट, नागपूर येथे २३ मार्च रोजी संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी खासदार संजय राऊत ,सिद्धार्थ वरदराजन , खासदार कृपाल तुमाने, राजेंद्र दर्डा, श्रीमती प्राजक्ता लवंगारे ( विभागीय आयुकत ) , विजय बाविस्कर संपादक व वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
गेल्या 33 वर्षापासून हा उपक्रम एका दैनिका मार्फत पत्रकारांसाठी राबविण्यात येत आहे. दरवर्षी 6 पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात येतो. कोरोना मुळे 3 वर्षाचा कार्यक्रम एकत्र करण्यात आला. श्री प्रमोद जाधव यांचेसह 17 पत्रकारांना पुरस्कार देण्यात आले. श्री प्रमोद जाधव हे रूढ अर्थाने पत्रकार नाहीत किंवा त्यांनी पत्रकारिता मधील शिक्षण घेतलेले नाही. या स्पर्धेसाठी आलेल्या सुमारे 100 लेखांमध्ये निवड करून त्यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला आहे, हि विशेष उल्लेखनीय बाब आहे.या लेखात महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती, भूगर्भ शास्त्र, प्रचलित कायदा इ. याचा विचार करून पाणी समस्येवर मात करण्यासाठी अल्पखर्चिक जलाशये कशी निर्माण करता येतील याचे यशस्वी उदाहरणांसह विवेचन केले आहे.सुमारे १२०० कोटी लिटर पाणी साठवता येईल , एवढया क्षमतेची जलाशये अत्यंत कमी खर्चात व वेळप्रसंगी विनामूल्य करणे शक्य आहे.
त्यानंतर प्रमोद जाधव यांना बालभारती मध्ये ही काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे अल्पखर्ची पाषाण तलाव व इतर अशा एकूण २१ संकल्पना, माहितीचा समावेश इयत्ता १० वीच्या जलसुरक्षा विषयाच्या पाठयपुस्तकात त्यांनी केला आहे.