शिरगांव | संतोष साळसकर : वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरीही रक्ताला पर्याय नाही. रक्ताचा प्रश्न सतत भेडसावत असतो. रुग्णांना रक्ताची गरज असली की कुटुंबीय सैरभैर होतात. तसेच संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना सारख्या संकटा वेळी अनेक जणांना रक्ताच्या तुडवड्यामुळे प्राण गमवावे लागले .अश्याच संकटाच्यावेळी रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून देवगड तालुक्यातील चाफेड भोगलेवाडी येथील श्री गाय गोठण गणपती मंदिर देवस्थान कमिटी आणि वाडीतील ग्रामस्थ मंडळ व युवा वर्ग यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन २४ मार्च रोजी करण्यात आले होते .
या शिबिराला रक्तदात्यांचे उत्तम असे सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले .
मोठ्या प्रमाणात युवा आणि तरुण उत्साही रक्त दात्यानी रक्त दान करून समाजाप्रती असणारी बांधिलकी जपत रक्त दानासारखे श्रेष्ठ दान करण्याचे कर्तव्य पार पाडले. या कार्यक्रमास विशाल विष्णू सावंत आणि नीलिमा विशाल सावंत यांचे सहकार्य लाभले तरी देवस्थान कमिटी च्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमा वेळी गाय गोठन गणपती मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ कांडर , उपाध्यक्ष महेश भोगले , सचिव तथा माजी सरपंच सत्यवान भोगले , खजिनदार सत्यवान कांडर , चाफेड गावाचे प्रथम नागरिक सरपंच सौ. संचीता भोगले , पोलिस पाटील संतोष सावंत , विजय भोगले,प्रियांका भोगले आणि आरोग्य विभाग कर्मचारी वर्ग तसेच वाडीतील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .