चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायत व रामेश्वर सहकारी सोसायटी चिंदर यांच्या सयुंक्त विद्यमाने गावातील लोकांना तहसिलला जाऊन वारंवार हेलपाटे मारुन आर्थिक बोजा व वेळ वाया जाऊ नये यासाठी रेशनींग कार्ड आणि विविध पेन्शन योजना यांच्या निराकरणासाठी आयोजित केलेल्या मेळाव्याला गावातील नागरीकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्याला आलेल्या संबंधीत अधिका-यांनी बहुतांश नागरिकांच्या समस्या निराकरण करायचा प्रयत्न केला.
छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमाला संजय गांधी निराधार योजनेचे आर. पी. मोंडकर, कृषीचे हर्षद चव्हाण, सेतूचे राऊळ हे तहसिलचे अधिकारी उपस्थित होत. यावेळी व्यासपिठावर सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वै, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, सौ. दुर्वा पडवळ, सानिका चिंदरकर, चिंदर सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, तलाठी योगेश माळी, पोलिस पाटील दिनेश पाताडे, दिगंबर जाधव, रवि घागरे, रणजित दत्तदास, विश्राम माळगांवकर, आबा पवार,सोसायटी व्हाईस चेअरमन सुनील पवार ,विश्वास खरात आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक महेंद्र मांजरेकर यांनी केले.