25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

यांना पेन्शन समजते…! (संपादकीय)

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित (संपादकीय विशेष) : नुकतीच पंजाबमध्ये सर्व माजी मंत्र्यांची पेन्शन म्हणजे निवृत्तीवेतन रद्द करण्याची घोषणा झाली. सामान्य नागरिकांना याचा थेट फायदा नक्कीच नसला तरिही काही मंत्र्यांच्या ऐतखाऊ ‘माजी’ पणाला चांगलीच चपराक बसली.

पेन्शन म्हणजे निवृत्तीवेतन..! ज्यांनी त्यांचे जीवन त्यांच्या नोकरीसाठी किंवा सेवेसाठी मनोभावे वेचले..अशांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी वयाच्या शारिरीक दुर्बलतेनंतर देण्यात येणारी काही रक्कम.
ढोबळमानाने वय वर्षे साठ झाल्यानंतर ती आपण गृहीत धरतो पण ती फक्त सरकारी नोकरीतच.

याचेच एक वेगळे उदाहरण सध्या थोड्या वेगळ्या पद्धतीने पहायला मिळत आहे. फक्त फरक असा आहे की ती व्यक्ती अल्पशा आजारपणात अकाली गेल्याने त्याच्या कुटुंबियांसाठी काही मदतीचे हात पुढे येतायत आणि एक कार्याध्यक्ष पेन्शनची जाणीव कायम राखू पहातायत.

मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवरील प्रमुख माळी (ग्राऊंडस्मन व स्थानिक क्युरेटर) श्री. पांडुरंग पाताडे ऊर्फ पाताडे मामा यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले.

पाताडे मामांची प्रामाणिक मेहनत पाहिलेले हजारो डोळे एकदम भरुन आले. मामांच्या हयातीत मामांसाठी खूप काही कोणालाच करता आलं नसेल कारण ते कधीच त्यांचे रडगाणे वगैरे गाताना दिसले नव्हते. ते खूप खळखळाट करुन बोलणारे नव्हते…किंवा खोटे खोटे बोलून समोरच्याला खूश करुन लाचार जगत नव्हते…! पाताडेमामा त्यांच्या मैदानावरील सेवेमध्ये चोख होते म्हणून लहानमोठ्या सर्वांनाच ते प्रिय होते. ते असे अचानक निघून जातील किंवा गेलेत ही गोष्टही तशी मनाला न पटणारीच.

पण ते गेल्यानंतर एक आवाहन सर्वत्र प्रसिद्ध झालं ते त्यांच्या कुटुंबियांच्या जाणीवेतून… ‘ एक हात मदतीचा’..!
हे आवाहन समाजमाध्यमांद्वारे एका समूहापर्यंत पोहोचलं त्या समूहाचे नांव ‘ मालवण टेनिस क्रिकेट..!’
अगदी हे आवाहन पोहोचल्यापासून समूहातील संवाद आणि हालचालींना वेग आला. मालवण टेनिस क्रिकेट हा समूह म्हणजे एक पंढरीची वारीच वाटावा असाच आहे..
यात लहान थोर,रंजले गांजले, धनाढ्य ते सामान्य आर्थिक स्थितीतला, बलाढ्य ते किरकोळ,प्रसिद्ध व शूर ते लाजाळू व अपरिचीत, फटकळ व मीतभाषी,चिडखोर व प्रेमळ असे सगळेच आहेत. यापैकी सत्तर टक्के पाताडे मामांना प्रत्यक्ष ओळखतही होतेच पण तीस टक्के फारसे न ओळखणारेही असतील.तरिही क्रिकेटर,क्रिकेटप्रेमी व माणुस म्हणून आपण पाताडेमामांना पेन्शन स्वरुपात काहीतरी देणं लागतोय ही भावना या समूहात अत्यंत गंभीरपणे जाणवून दिली गेली हे खरेच महत्त्वाचे.

पाताडेमामा स्वतः खूप खळखळाट करुन हसत नसत तरी त्यांची विनोदबुद्धी व हास्य नेहमी छानच जपलेलं होतं आणि तसंच प्रसन्न हास्य जपत आज मालवण टेनिस क्रिकेट समूहातील प्रमुख प्रबंधक व इतर सगळेच पाताडेमामांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत उभी करण्यासाठी आपापल्यापरिने झटतायत.

वरवर बघताना यातील बहुतांश युवा तथा तरुण सदस्य हे खूप बेफिकिर वाटतील किंवा चेष्टेखोरही वाटतील पण जेंव्हा कर्तव्याची वेळ येते तेंव्हा त्यांच्यातील अस्सल माणसे डोळ्यांत मामांसाठी पाणी असूनही तोंडावर व शब्दांत हास्य ठेवून एकमेकांचा हुरुप वाढवतायत.

आर्थिक मदत गेलेला माणुस परतवून आणू शकत नाही …पोकळी भरु शकत नाही हे जरी खरे असले तरी समाजासाठी जीवनातील काही वर्ष वेचलेल्या माणसाचे कुटुंब आर्थिक विवंचनेत अडकू नये हा समाजानेच केलेला एक अनोखा पेन्शन विचार मालवण टेनिस क्रिकेट समूहाने आणखी अनोखेपणे केलेला दिसून येतोय.

इथे नावं घेणं खरंच उचित् नाही परंतु कोणी किती दिले यापेक्षा हा निधी उभा करताना अगदी स्वतःलाच गरज असल्यासारखे विनम्रपण घेताना निखिल परब,वैभव सावंत,मंदार गावडे व इतर सहकारी क्रिकेटप्रेमी युवक प्रसन्नपणे कुठलाच मोठेपणाचा आव न आणता निधीसाठी आवाहन संवाद करतायत ते खरंच खूप समाज जपणुकीचेच उदाहरण.

ही मदत नुकती सुरु झालीय …थांबलेली नाही..!
अजूनही कोणाला या प्रसन्न पेन्शन प्रक्रियेचा हिस्सा बनायचे असेल तर निखिल परब यांच्या 9168191957 या गुगलपे क्रमांकावर किंवा पिंकू मोरे ,मालवण यांच्याकडेही आपण यथाशक्ती मदत सुपूर्त करु शकतो.

मालवण टेनिस क्रिकेट समूहात जरी आपण थेट असलो किंवा नसलो तरिही या समाज जगात नक्कीच आहोत त्यामुळे सर्वांचीच यथाशक्ती मदत प्रार्थनीय आहेच.

मालवण टेनिस क्रिकेट समूहातील प्रत्येक विचार व जाणीव घटकाची विशेष प्रशंसा.
ही मालवण टेनिस क्रिकेट समूहाबद्दलची प्रशंसा म्हणजे मोठेपणा नक्कीच नाही परंतु एक खेळ व त्यातील स्थानिक खेळाडू समाजातील एका सामान्य कुटुंबाची अस्ताव्यस्त घडी त्याच्यापरिने नीटनेटकी करु पहात याचे ज्वलंत स्थानिक उदाहरण आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित (संपादकीय विशेष) : नुकतीच पंजाबमध्ये सर्व माजी मंत्र्यांची पेन्शन म्हणजे निवृत्तीवेतन रद्द करण्याची घोषणा झाली. सामान्य नागरिकांना याचा थेट फायदा नक्कीच नसला तरिही काही मंत्र्यांच्या ऐतखाऊ 'माजी' पणाला चांगलीच चपराक बसली.

पेन्शन म्हणजे निवृत्तीवेतन..! ज्यांनी त्यांचे जीवन त्यांच्या नोकरीसाठी किंवा सेवेसाठी मनोभावे वेचले..अशांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी वयाच्या शारिरीक दुर्बलतेनंतर देण्यात येणारी काही रक्कम.
ढोबळमानाने वय वर्षे साठ झाल्यानंतर ती आपण गृहीत धरतो पण ती फक्त सरकारी नोकरीतच.

याचेच एक वेगळे उदाहरण सध्या थोड्या वेगळ्या पद्धतीने पहायला मिळत आहे. फक्त फरक असा आहे की ती व्यक्ती अल्पशा आजारपणात अकाली गेल्याने त्याच्या कुटुंबियांसाठी काही मदतीचे हात पुढे येतायत आणि एक कार्याध्यक्ष पेन्शनची जाणीव कायम राखू पहातायत.

मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवरील प्रमुख माळी (ग्राऊंडस्मन व स्थानिक क्युरेटर) श्री. पांडुरंग पाताडे ऊर्फ पाताडे मामा यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले.

पाताडे मामांची प्रामाणिक मेहनत पाहिलेले हजारो डोळे एकदम भरुन आले. मामांच्या हयातीत मामांसाठी खूप काही कोणालाच करता आलं नसेल कारण ते कधीच त्यांचे रडगाणे वगैरे गाताना दिसले नव्हते. ते खूप खळखळाट करुन बोलणारे नव्हते…किंवा खोटे खोटे बोलून समोरच्याला खूश करुन लाचार जगत नव्हते…! पाताडेमामा त्यांच्या मैदानावरील सेवेमध्ये चोख होते म्हणून लहानमोठ्या सर्वांनाच ते प्रिय होते. ते असे अचानक निघून जातील किंवा गेलेत ही गोष्टही तशी मनाला न पटणारीच.

पण ते गेल्यानंतर एक आवाहन सर्वत्र प्रसिद्ध झालं ते त्यांच्या कुटुंबियांच्या जाणीवेतून… ' एक हात मदतीचा'..!
हे आवाहन समाजमाध्यमांद्वारे एका समूहापर्यंत पोहोचलं त्या समूहाचे नांव ' मालवण टेनिस क्रिकेट..!'
अगदी हे आवाहन पोहोचल्यापासून समूहातील संवाद आणि हालचालींना वेग आला. मालवण टेनिस क्रिकेट हा समूह म्हणजे एक पंढरीची वारीच वाटावा असाच आहे..
यात लहान थोर,रंजले गांजले, धनाढ्य ते सामान्य आर्थिक स्थितीतला, बलाढ्य ते किरकोळ,प्रसिद्ध व शूर ते लाजाळू व अपरिचीत, फटकळ व मीतभाषी,चिडखोर व प्रेमळ असे सगळेच आहेत. यापैकी सत्तर टक्के पाताडे मामांना प्रत्यक्ष ओळखतही होतेच पण तीस टक्के फारसे न ओळखणारेही असतील.तरिही क्रिकेटर,क्रिकेटप्रेमी व माणुस म्हणून आपण पाताडेमामांना पेन्शन स्वरुपात काहीतरी देणं लागतोय ही भावना या समूहात अत्यंत गंभीरपणे जाणवून दिली गेली हे खरेच महत्त्वाचे.

पाताडेमामा स्वतः खूप खळखळाट करुन हसत नसत तरी त्यांची विनोदबुद्धी व हास्य नेहमी छानच जपलेलं होतं आणि तसंच प्रसन्न हास्य जपत आज मालवण टेनिस क्रिकेट समूहातील प्रमुख प्रबंधक व इतर सगळेच पाताडेमामांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत उभी करण्यासाठी आपापल्यापरिने झटतायत.

वरवर बघताना यातील बहुतांश युवा तथा तरुण सदस्य हे खूप बेफिकिर वाटतील किंवा चेष्टेखोरही वाटतील पण जेंव्हा कर्तव्याची वेळ येते तेंव्हा त्यांच्यातील अस्सल माणसे डोळ्यांत मामांसाठी पाणी असूनही तोंडावर व शब्दांत हास्य ठेवून एकमेकांचा हुरुप वाढवतायत.

आर्थिक मदत गेलेला माणुस परतवून आणू शकत नाही …पोकळी भरु शकत नाही हे जरी खरे असले तरी समाजासाठी जीवनातील काही वर्ष वेचलेल्या माणसाचे कुटुंब आर्थिक विवंचनेत अडकू नये हा समाजानेच केलेला एक अनोखा पेन्शन विचार मालवण टेनिस क्रिकेट समूहाने आणखी अनोखेपणे केलेला दिसून येतोय.

इथे नावं घेणं खरंच उचित् नाही परंतु कोणी किती दिले यापेक्षा हा निधी उभा करताना अगदी स्वतःलाच गरज असल्यासारखे विनम्रपण घेताना निखिल परब,वैभव सावंत,मंदार गावडे व इतर सहकारी क्रिकेटप्रेमी युवक प्रसन्नपणे कुठलाच मोठेपणाचा आव न आणता निधीसाठी आवाहन संवाद करतायत ते खरंच खूप समाज जपणुकीचेच उदाहरण.

ही मदत नुकती सुरु झालीय …थांबलेली नाही..!
अजूनही कोणाला या प्रसन्न पेन्शन प्रक्रियेचा हिस्सा बनायचे असेल तर निखिल परब यांच्या 9168191957 या गुगलपे क्रमांकावर किंवा पिंकू मोरे ,मालवण यांच्याकडेही आपण यथाशक्ती मदत सुपूर्त करु शकतो.

मालवण टेनिस क्रिकेट समूहात जरी आपण थेट असलो किंवा नसलो तरिही या समाज जगात नक्कीच आहोत त्यामुळे सर्वांचीच यथाशक्ती मदत प्रार्थनीय आहेच.

मालवण टेनिस क्रिकेट समूहातील प्रत्येक विचार व जाणीव घटकाची विशेष प्रशंसा.
ही मालवण टेनिस क्रिकेट समूहाबद्दलची प्रशंसा म्हणजे मोठेपणा नक्कीच नाही परंतु एक खेळ व त्यातील स्थानिक खेळाडू समाजातील एका सामान्य कुटुंबाची अस्ताव्यस्त घडी त्याच्यापरिने नीटनेटकी करु पहात याचे ज्वलंत स्थानिक उदाहरण आहे.

error: Content is protected !!