कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : कळसुली -शिरवल वामन वाफा दरम्यान रस्त्यावर रिक्षातुन प्रवास करणाऱ्या कळसुली गागोसखल वाडीतील दोन्ही सख्खा बहिणीचा रिक्षा पलटी होऊन अपघात घडल्याने कु.निकीता गावकर,कु.नम्रता गावकर,दोन्ही सख्ख्या बहिणी गंभीर जखमी झाल्याने होत्या.
त्यांची गंभीर दुखापत झाली असल्याने गोवा बांबूळी येथे हलविल्या आले होत.हे वृत्त समजताच सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांच्यासह कळसुली गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. कणकवली एसटी विभाग नियंत्रकांची घेतली भेट घेऊन,एसटी बस तातडीने सुरू करा या मागणीवर ग्रामस्थ ठाम होते.
कळसुली एसटी बस तातडीने सुरू करा.जोपर्यंत एसटी सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही इकडून हलणार नाही! या पवित्र्यात असलेले आक्रमक ग्रामस्थ पाहून शेवटी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून बुधवार २३मार्च पासून सकाळी ७;३० वाजता व दुपारी १२:३० अशा दोन गाड्या सुरू करण्याचे आश्वासन आगार व्यवस्थापक यांनी ग्रामस्थांना दिले.
यावेळी सोबत रुजाय फर्नांडिस, किशोर गांवकर, विलास गांवकर, तुकाराम गांवकर, शशिकांत गांवकर, सुभाष गांवकर, तुषार गांवकर, स्वप्नील नेरकर, सहदेव (बाळा) नाईक सह कळसुली ग्रामस्थ उपस्थित होते.