23.3 C
Mālvan
Wednesday, January 29, 2025
IMG-20240531-WA0007

तारकर्ली प्रिमीअर लीगमध्ये ‘त्रिष्टी स्टाॅर्म रायडर्स’ संघाचे अनपेक्षित विजेतपद…!

- Advertisement -
- Advertisement -

अंतिम सामन्यात बलाढ्य महाराजा तारकर्ली संघाला नमवत कोरले 2022 टि.पि.एल.चषकावर नांव..!

मालवण | सहिष्णू पंडित : त्रिष्टी स्टाॅर्म रायडर्सने 2022च्या तारकर्ली प्रिमीअर लीगमध्ये सर्व अनुभवी संघांना नमवत चषकावर नांव कोरले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या टोपिवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राउंडवर गेले दोन दिवस अतिशय शिस्तबद्ध ग्लॅमरस आयोजनाने चाललेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना महाराजा तारकर्ली विरुद्ध त्रिष्टी स्टाॅर्म रायडर्स या दोन संघात झाला.

महाराजा तारकर्ली संघात फाॅर्मातील सुप्रसिद्ध खेळाडू सुकृत जोशी व बजरंग कुबल सारखे कसलेले खेळाडू असल्याने त्यांचे पारडे किंचित जड होते असा क्रिकेट रसिकांचा अंदाज होता..आणि तुलनात्मक कमी अनुभवी त्रिष्टी संघातील खेळाडू स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक हरल्याने थोडे पिछाडीवर गेल्यासारखेच झाले.
परंतु तीन षटकांच्या अंतिम सामन्यात परेश लोणे आणि रोहीत केरकर या दोन फलंदाजांच्या स्टाॅर्मी फलंदाजीमुळे त्रिष्टी स्टाॅर्म रायडर्सने 45 धावांचा डोंगर रचत महापुरुष तारकर्ली संघासमोर तीन षटकांत 46 धावांचे आव्हान ठेवले.

परेश लोणे 19 धावा (1 षटकार ,दोन चौकार) व रोहीत केरकरच्या 25 धावा (तीन षटकार) या दोघांच्या वादळासमोर अनुभवी सुकृत जोशीने एका षटकात केवळ 7 धावा दिल्या तरिही उर्वरीत दोन गोलंदाजाची जबरदस्त धुलाई झाली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना महापुरुष तारकर्ली संघाने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून जबरदस्त सुरवात केली परंतु नंतर त्यांनी संपूर्ण डावात फारशी चमक न दाखवल्याने केवळ 18 धावा जमवू शकले आणि त्रिष्टी इलेव्हन संघाने तब्बल 27 धावांनी सामना खिशात घालून तारकर्ली प्रिमीअर लीगच्या चषकावर त्यांचे नांव कोरले.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून सिंधुदुर्गातील अधिकृत क्रिकेट पंच मनिष पेडणेकर आणि गोविंद ऊर्फ बंटी केरकर यांनी काम पाहिले.

स्पर्धेचे बक्षिस वितरण तारकर्लीचे मान्यवर व पुरस्कर्ते श्री. सहदेव साळगांवकर ,श्री.रामचंद्र चोपडेकर, टोपिवाला हायस्कूलचे श्री.दिगंबर सामंत, श्री. मयेकर ,श्री.गोपी कोळंबकर , समालोचक श्री.नाना नाईक , देऊलकर , आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक सुयोग पंडित आणि जिल्हा बॅन्क संचालक श्री बाबा परब यांच्या हस्ते झाले.

यावेळी तारकर्ली क्रिकेट क्लबच्या वार्षिक पुरस्कारांचेही वितरण झाले ज्यात सर्वोत्कृष्ट आयडाॅल खेळाडू विवेक चिंदरकर याला विशेष गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट वार्षिक गोलंदाज,फलंदाज,क्षेत्ररक्षक व यष्टीरक्षकासाठीही पुरस्कार देण्यात आले. सुकृत जोशीला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

बि.सि.सि.आयला अपेक्षित संपूर्ण इंग्रजी माध्यमातून पंचगिरीची परीक्षा देऊन व्यावसायिक पंच म्हणून काम पहाणार्या मनीष पेडणेकर यांचाही तारकर्ली स्पोर्टस् क्लबने विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.

तारकर्ली प्रिमीअर लीगच्या या टेनिसबाॅल स्पर्धेचे.ही सर्वोत्कृष्ट गोलंदाज,फलंदाज,यष्टीरक्षक व क्षेत्ररक्षकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

तारकर्ली क्रिकेट क्लबचे गोविंद ऊर्फ बंटी केरकर यांच्या संकल्पनेतून सर्व तारकर्ली क्रिकेट क्लब खेळाडू,सदस्य व पदाधिकारी,मान्यवर ग्रामस्थ,स्थानिक पुरस्कर्ते यांचे या स्पर्धेच्या आयोजनात एकसंध योगदान विशेष आकर्षण ठरते व ते याही वर्षी ठरले.

विजेता त्रिष्टी स्टाॅर्म रायडर्सच्या ताज्या दमाच्या खेळाडूंची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट वर्तुळात प्रशंसा होत आहे. तारकर्ली हे गांव जगातील पर्यटन नकाशावर दिमाखात असते त्याच आदराने तारकर्ली क्रिकेट क्लब व तारकर्ली प्रिमीअर लीग या दोन घटकांनी क्रिडा संस्कृती जोपासली असल्याची भावना उपस्थित मान्यवर व महाराष्ट्र राज्य क्रिकेटसिकांतून व्यक्त होत आहे.

तारकर्ली प्रिमीअर लीगला खालील पुरस्कर्त्यांचे योगदान लाभले.

▪️ *आदी आर्यन बिल्डिंग* मटेरियल सप्लायर.
देवली मालवण
▪️ *हॉटेल मालवणी*
कोळंब ब्रीज नजीक मालवण
▪️ *मंगलमूर्ती स्कुबा डायविंग* , मालवण
▪️ *देऊलकर मसाले* ,
मासळी मार्केट नजीक,मालवण
▪️ *सहदेव साळगावकर*
*रामचंद्र चोपडेकर*
▪️ *राणे मसाले, डोंबिवली*
मालवणी मसाले आता मुंबईत
मोबाईल -९९२०४०३१८६
▪️ *शुभांगी होम स्टे* ,
वायरी बांध तारकर्ली .
श्री. प्रदीप आचरेकर
9969324475
▪️ *सुलोचना बोटिंग आणि स्कुबा डायविंग*.
वैभव खोबरेकर – 9421572514
▪️ *श्री. स्वप्नील गोविंद खराडे*
▪️ *मातोश्री होम स्टे तारकर्ली*
▪️ *प्रसाद व्यंकटेश केळूसकर*
▪️ *शत्रुघ्न कृष्णा कुबल*
▪️ *गणेश कृपा स्पोर्ट फिशिंग तारकर्ली* 094041 72177
▪️ *श्री. दिलीप जगन्नाथ जोशी*

▪️ *महाराजा स्पोर्ट फिशिंग आणि बोटिंग*

▪️ *गोपीचंद कोळंबकर*

▪️ *मानस केक हाऊस*

▪️ *FINCHUNK*

▪️ *BLUE SEA HOTEL*

बक्षिस वितरणाचे सूत्रसंचालन श्री गोविंद ऊर्फ बंटी केरकर यांनी केले व सर्व पुरस्कर्त्यांचे आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

1 Comment

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

वैभव खोबरेकर - 9421572514
▪️ *श्री. स्वप्नील गोविंद खराडे*
▪️ *मातोश्री होम स्टे तारकर्ली*
▪️ *प्रसाद व्यंकटेश केळूसकर*
▪️ *शत्रुघ्न कृष्णा कुबल*
▪️ *गणेश कृपा स्पोर्ट फिशिंग तारकर्ली* 094041 72177
▪️ *श्री. दिलीप जगन्नाथ जोशी*

▪️ *महाराजा स्पोर्ट फिशिंग आणि बोटिंग*

▪️ *गोपीचंद कोळंबकर*

▪️ *मानस केक हाऊस*

▪️ *FINCHUNK*

▪️ *BLUE SEA HOTEL*

बक्षिस वितरणाचे सूत्रसंचालन श्री गोविंद ऊर्फ बंटी केरकर यांनी केले व सर्व पुरस्कर्त्यांचे आभार मानले.

error: Content is protected !!