अक्कलकोट येथे झाले पुरस्कार वितरण
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक विश्वस्त व देवगडचे सुपुत्र स्वामी भक्त श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांचा अक्कलकोट भूषण या पुरस्काराने अक्कलकोट येथे सन्मान करण्यात आला.श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीप्रसाराची व सामाजिक कार्याची दखल घेऊन हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराडचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील फडतरे यांच्या उपस्थितीत वटवृक्ष देवस्थान अक्कलकोटचे अध्यक्ष श्री महेश इंगळे,व समाधी मठातील चोळप्पा महाराजांचे पाचवे वंशज श्री अन्नुगुरूजी यांच्या हस्ते नंदकुमार तुकाराम पेडणेकर याना सदर पुरस्कार समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. हडपीड येथील स्वामी समर्थ मठाच्या उभारणीत नंदकुमार पेडणेकर यांचे मोठे योगदान आहे. देणगीदार शोधून मठाच्या बांधकामासाठी देणगी गोळा करणे, अनेकांना स्वामी भक्तीची दीक्षा देणे, गरजूंना मदत करणे तसेच मठाच्या माध्यमातून विविध उपक्रम ते राबवित असतात. त्यांच्या एकूणच या कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराडचे संस्थापक विश्वस्त श्री.सुनिल फडतरे हे आपल्या संस्थेच्या माध्यमातून भक्तीमार्गातील व समाजकार्यातुन काम करणाऱ्या व्यक्तींच्या त्यांच्या बहुमुल्य कामाची दखल घेऊन गेली नऊ वर्षे अक्कलकोट येथे वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट यांच्या माध्यमातून सन्मानचिन्ह देऊन पुरस्कृत करतात.यावेळी वटवृक्ष देवस्थान अक्कलकोटचे अध्यक्ष स्वामी भक्त श्री महेश इंगळे, तसेच श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई कार्यकारीचे सरचिटणीस श्री नितीन म्हापसेकर, खजिनदार श्री प्रभाकर यशवंत राणे, सभासद श्री.मधुकर भडसावळे आदी उपस्थित होते.