मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: परीक्षेत यश मिळविण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते.आयुष्यात पुढे जाताना पुन्हा शाळेचा आनंद मिळत नाही.ध्येय निश्चित करा आणि मार्गक्रमण करा.जीवनात मोठे होण्यासाठी आज अनेक पर्याय आहेत. माजी विद्यार्थी म्हणून जबाबदारी ओळखा व शाळेचे ऋण भविष्यात विसरू नका असे प्रतिपादन खुडी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शरद घाडी यांनी येथे केले.
खुडी माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावर खुडी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शरद घाडी,उपसचिव हरेश्र्वर राणे,खुडी शिक्षण प्रसार मंडळाचे सचिव तसेच उपसरपंच दिपक कदम, माजी सरपंच प्रकाश मुणगेकर , शिक्षणप्रेमी अशोक शिद्रुक , प्रा.शाळा समितीचे अध्यक्ष शशिकांत कावले , ग्रामस्थ निलेश कामतेकर , बाबू जोईल , प्रमोद भाट,बबन घाडी, आप्पा जोईल, पालक महिला, मुख्याध्यापिका सौ गोरे मॅडम,सहशिक्षक साटम सर, सौ कदम मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी वाळके व राऊत आणि विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन व आभार साटम सर यांनी मानले.