मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कमी वयातच सांस्कृतिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दलचा विशेष पुरस्कार आर्या किशोर कदम हिला प्रदान करण्यात आला. कु. आर्या किशोर कदम कणकवली येथील एस एम हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असून सांस्कृतिक आणि वक्तृत्व क्षेत्रातील योगदानाबद्दल लावण्यसिंधु लोककला आणि चित्रपट निर्मिती सहाय्य संस्थाच्या वतीने सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी विचार मंचावर संचालिका अभिनेत्री सौ अक्षता कांबळी व प्रांजल पराडकर ,संस्थापक चंद्रशेखर उपरकर, प्रबंधक उर्मिला यादव आदी मंडळी उपस्थित होती कु. आर्या कदम हिने आपल्या शालेय वयातच अभ्यासाबरोबर वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत रसिकांकडून वाहवा मिळवली.तसेच वक्तृत्व स्पर्धेत राज्यस्तरापर्यंत पारितोषिके पटकावली आहेत, मी सावित्रीबाई फुले बोलतेय या एकपात्री सादरीकरणाबद्दल तिचे सर्व क्षेत्रातून विशेष कौतुक होत आहे. आर्याच्या या उल्लेखनीय यशासाठी आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी एस एम हायस्कूल कणकवली संस्थेचे अध्यक्ष सचिव व मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक,संदीप मेस्त्री मित्र मंडळ व दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आणि दर्पण परिवार, कास्ट्राईब शिक्षक संघटना सिंधुदुर्ग यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.