मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : स्पर्धा परीक्षांद्वारे यश संपादित करून जीवन यशस्वी करणे म्हणजे तिमिरातूनी तेजाकडे जाणे. तिमिरातूनी तेजाकडे जाण्याचा ध्यास प्रत्येक विद्यार्थ्याला हवा असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र व प्रेरणादायी वक्ते श्री.सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांनी येथे केले.
ज्ञानगंगा अविरत सेवा दहीबाव बागमळा आणि एस.बी.राणे हायस्कूल, नारिंग्रे यांच्या संयुक्त विद्यमानाने नारिंग्रे आणि पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
एस.बी.राणे हायस्कूल सभागृहात कार्यक्रम व्यासपीठावर नारिंग्रे सरपंच, श्रीकांत गावकर, एस.बी राणे हायस्कूल मुख्याध्यापक, मंडले सर, रेडकर सरांचे महाविद्यालयीन मित्र श्री. प्रवीण घाडी, श्री. परेश रुमडे, अरुण कदम, दहिबाव ग्रा.पं सदस्य सुशील चेंदवणकर, श्री कुंदन आचरेकर सर, गुरुप्रसाद मांजरेकर, प्रसाद परब. आदी मान्यवर उपस्थित होते.
तिमिरातूनी तेजाकडे अंतर्गत उपक्रम यु पी एस सी, एम पी एस सी. सारख्या स्पर्धा परीक्षा, विविध सरकारी नोकऱ्या याबाबत विस्तृत माहिती तसेच त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम, अभ्यासाचे स्वरूप यांचे विश्लेषण त्यांनी केले. “शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव” ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नसून त्यासाठी प्रत्येक शहरात ग्रामीण भागात अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी एस बी राणे हायस्कूल विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री. परेश रुमडे यांनी केले. आपले उज्वल भवितव्य घडविण्यासाठी श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांना कॉल तसेच व्हाट्सअप च्या माध्यमातून 9969657820 या क्रमांकाद्वारे संपर्कात राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.