जेष्ठ उद्योजिका मालिनी मयेकर यांचा विशेष सत्कार.
चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महिला दिन उत्साहात सपन्न झाला. यामध्ये दिंडी नृत्य, फुगडी, समुह गीत, प्रेरणा गीत असे महिलांचे विविध रंगी कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून टोपीवाला हायस्कूलच्या शिक्षिका सौ. ज्योती रविकिरण तोरसकर उपस्थित होत्या.
सरपंच सौ. राजश्री कोदे व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. सौ. तोरस्कर यांनी महिलांना बहूमोल मार्गदर्शन केले. नागोचीवाडी येथील जेष्ठ उद्योजिका सौ. मालिनीताई मयेकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
उपसरपंच दिपक सुर्वे, माजी सरपंच धोंडू चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य दुर्वा पडवळ, सानिका चिंदरकर, जान्हवी घाडी, स्वरा पालकर, सि. आर. पी मनिषा मसुरकर, सिध्दि पडवळ, प्राजक्ता पडवळ, दिपाली साटम, शांती सुर्वे तसेच गावातील बहुसंख्य महिला यात सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि समारोप सरपंच सौ. राजश्री कोदे यांनी तर सुत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य सौ. दुर्वा पडवळ यांनी केले.