27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

उन्नती केरकर ठरल्या होम मिनिस्टर…!

- Advertisement -
- Advertisement -

भाजपा महिला मोर्चा , वेंगुर्ले आयोजित होममिनीस्टर स्पर्धा.

चिंदर | विवेक परब : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मोर्चा वेंगुर्लेच्यावतीने साईमंगल कार्यालयात ‘होममिनीस्टर – खेळ पैठणीचा ‘ या स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी या स्पर्धेत ६५ महीला स्पर्धक उस्फूर्त सहभागी झाल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन कृतीशील शिक्षीका प्राजक्ता आपटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी मार्गदर्शन करताना प्राजक्ता आपटे म्हणाल्या की आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री आपलं कर्तृत्व दाखवत आहे. प्रगतीच्या वाटेवरुन अवकाशात झेप घेत आहे. पण तिची आजची ही प्रगती,हे स्वातंत्र्य सहज, सुलभ नव्हतं. पूर्वीच्या काळी चूल आणि मूल एवढंच तिचं कार्यक्षेत्र होतं. उंबरठ्याबाहेर पहिलं पाऊल टाकणं स्त्रीला सोपं नव्हतं तेव्हाच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता उंबरठा ओलांडून घराबाहेर पडणाऱ्या स्त्रीला बरेच त्रास सहन करावे लागत होते तिच्या प्रगतीच्या वाटेवर अनेक प्रकारचे अडथळे होते पण या खडतर वाटेवर होऊन ती समर्थपणे चालली सगळे त्रास सहन केले म्हणून आज आपल्याला आपल्या विकासासाठी अनंत नव्या वाटा दिसतात पूर्वीच्या पिढीतील स्त्रियांनी स्वातंत्र्याची दालनं खुली करून दिली प्रत्येक पिढी गणीक ती विस्तारत गेली आपणही या मीळालेल्या हक्कांचा स्वातंत्र्याचा योग्य तो उपयोग करून आपल्या पुढच्या पिढीमध्ये उत्तम संस्कार होणे योग्य नीती मूल्यांची रुजवण
करून उत्तम समाज घडविण्यासाठी प्रयत्न करुया.

यावेळी व्यासपीठावर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा ज्योती देसाई , लिनेस क्लबच्या अध्यक्षा उर्मिला सावंत , महिला ता.अध्यक्षा स्मिता दामले , शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर , महिला जिल्हा सरचिटणीस सारीका काळसेकर , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , नगरसेविका श्रेया मयेकर – साक्षी पेडणेकर – कृपा मोंडकर – पुनम जाधव, ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर, माजी नगराध्यक्षा डाॅ. पुजा कर्पे, खानोली सरपंचा प्रणाली खानोलकर, अक्षया गिरप, वृंदा मोर्डेकर , रसीका मठकर, आकांक्षा परब, लक्ष्मी परब, गौरी मराठे, कीर्ती मंगल भगत, हसीना बेन मकानदार, लिनेस क्लबच्या निला यरनाळकर – आश्विनी गावसकर – कविता भाटीया – प्राची मणचेकर – बिना भाटीया – हेमा गावसकर व अंजली धुरी इत्यादी उपस्थित होते.

या स्पर्धेचे सूत्रसंचालन ” अनिता कराओके ” चे कलाकार अनिता आरोंदेकर, शैलेश जामदार व अभय आरोंदेकर यांनी खुमासदार करून कार्यक्रमात रंगत आणली.

या स्पर्धेतील विजेत्या उन्नती केरकर ह्या पैठणीच्या मानकरी ठरल्या ही पैठणी पाॅप्युलर क्लाॅथ स्टोअर्सचे अमर दाभोलकर यांनी पुरस्कृत केली होती .

द्वितीय क्रमांक दिव्या पवार हिला सोन्याची नथ मीळाली हे बक्षीस वक्रतुंड ज्वेलर्सचे भाऊ मालवणकर यांनी दिले . तृतीय क्रमांक निकीता जोशी हिला चांदीचे निरंजन मिळाले हे बक्षीस दुर्वांकुर ज्वेलर्सचे शैलेश तुळसुलकर यांनी दिले . चतुर्थ क्रमांक अस्मिता गिरप हिला साडी मिळाली हे बक्षीस महेंद्र क्लाॅथ स्टोअर्सचे मिलिंद पिंजाणी यांनी दिले . पाचवे बक्षीस प्रज्ञा पेडणेकर हिला साडी मिळाली हे बक्षीस काजुचे व्यापारी अविनाश गिरप यांनी दिले.उत्तेजनार्थ निलम कामत हिला गृहपयोगी वस्तु बक्षीस मिळाले हे बक्षीस महेंद्र वस्तू भांडार चे नरेश गावडे यांनी दिले . दुसरे उत्तेजनार्थ बक्षीस मुग्धा वैद्य हिला ‘की – स्टॅंड’ मिळाले हे बक्षीस काॅनबॅकचे मोहन होडावडेकर यांनी दिले .

या स्पर्धेला शेकडो महिलांची उपस्थिती होती.
स्पर्धेचे परीक्षण सौ.चव्हाण यांनी केले .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

भाजपा महिला मोर्चा , वेंगुर्ले आयोजित होममिनीस्टर स्पर्धा.

चिंदर | विवेक परब : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मोर्चा वेंगुर्लेच्यावतीने साईमंगल कार्यालयात 'होममिनीस्टर - खेळ पैठणीचा ' या स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी या स्पर्धेत ६५ महीला स्पर्धक उस्फूर्त सहभागी झाल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन कृतीशील शिक्षीका प्राजक्ता आपटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी मार्गदर्शन करताना प्राजक्ता आपटे म्हणाल्या की आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री आपलं कर्तृत्व दाखवत आहे. प्रगतीच्या वाटेवरुन अवकाशात झेप घेत आहे. पण तिची आजची ही प्रगती,हे स्वातंत्र्य सहज, सुलभ नव्हतं. पूर्वीच्या काळी चूल आणि मूल एवढंच तिचं कार्यक्षेत्र होतं. उंबरठ्याबाहेर पहिलं पाऊल टाकणं स्त्रीला सोपं नव्हतं तेव्हाच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता उंबरठा ओलांडून घराबाहेर पडणाऱ्या स्त्रीला बरेच त्रास सहन करावे लागत होते तिच्या प्रगतीच्या वाटेवर अनेक प्रकारचे अडथळे होते पण या खडतर वाटेवर होऊन ती समर्थपणे चालली सगळे त्रास सहन केले म्हणून आज आपल्याला आपल्या विकासासाठी अनंत नव्या वाटा दिसतात पूर्वीच्या पिढीतील स्त्रियांनी स्वातंत्र्याची दालनं खुली करून दिली प्रत्येक पिढी गणीक ती विस्तारत गेली आपणही या मीळालेल्या हक्कांचा स्वातंत्र्याचा योग्य तो उपयोग करून आपल्या पुढच्या पिढीमध्ये उत्तम संस्कार होणे योग्य नीती मूल्यांची रुजवण
करून उत्तम समाज घडविण्यासाठी प्रयत्न करुया.

यावेळी व्यासपीठावर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा ज्योती देसाई , लिनेस क्लबच्या अध्यक्षा उर्मिला सावंत , महिला ता.अध्यक्षा स्मिता दामले , शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर , महिला जिल्हा सरचिटणीस सारीका काळसेकर , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , नगरसेविका श्रेया मयेकर - साक्षी पेडणेकर - कृपा मोंडकर - पुनम जाधव, ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर, माजी नगराध्यक्षा डाॅ. पुजा कर्पे, खानोली सरपंचा प्रणाली खानोलकर, अक्षया गिरप, वृंदा मोर्डेकर , रसीका मठकर, आकांक्षा परब, लक्ष्मी परब, गौरी मराठे, कीर्ती मंगल भगत, हसीना बेन मकानदार, लिनेस क्लबच्या निला यरनाळकर - आश्विनी गावसकर - कविता भाटीया - प्राची मणचेकर - बिना भाटीया - हेमा गावसकर व अंजली धुरी इत्यादी उपस्थित होते.

या स्पर्धेचे सूत्रसंचालन " अनिता कराओके " चे कलाकार अनिता आरोंदेकर, शैलेश जामदार व अभय आरोंदेकर यांनी खुमासदार करून कार्यक्रमात रंगत आणली.

या स्पर्धेतील विजेत्या उन्नती केरकर ह्या पैठणीच्या मानकरी ठरल्या ही पैठणी पाॅप्युलर क्लाॅथ स्टोअर्सचे अमर दाभोलकर यांनी पुरस्कृत केली होती .

द्वितीय क्रमांक दिव्या पवार हिला सोन्याची नथ मीळाली हे बक्षीस वक्रतुंड ज्वेलर्सचे भाऊ मालवणकर यांनी दिले . तृतीय क्रमांक निकीता जोशी हिला चांदीचे निरंजन मिळाले हे बक्षीस दुर्वांकुर ज्वेलर्सचे शैलेश तुळसुलकर यांनी दिले . चतुर्थ क्रमांक अस्मिता गिरप हिला साडी मिळाली हे बक्षीस महेंद्र क्लाॅथ स्टोअर्सचे मिलिंद पिंजाणी यांनी दिले . पाचवे बक्षीस प्रज्ञा पेडणेकर हिला साडी मिळाली हे बक्षीस काजुचे व्यापारी अविनाश गिरप यांनी दिले.उत्तेजनार्थ निलम कामत हिला गृहपयोगी वस्तु बक्षीस मिळाले हे बक्षीस महेंद्र वस्तू भांडार चे नरेश गावडे यांनी दिले . दुसरे उत्तेजनार्थ बक्षीस मुग्धा वैद्य हिला 'की - स्टॅंड' मिळाले हे बक्षीस काॅनबॅकचे मोहन होडावडेकर यांनी दिले .

या स्पर्धेला शेकडो महिलांची उपस्थिती होती.
स्पर्धेचे परीक्षण सौ.चव्हाण यांनी केले .

error: Content is protected !!