मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील रामगड गावची कन्या आणि मुंबई दादर येथील दिंगबर पाटकर गुरुजी विद्यालय दादर ची विद्यार्थिनी निशा प्रमोद सोलकर जिल्हा सिंधुदुर्ग हिने तायकोंडो या खेळात नॅशनल स्तरावर विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल महिला बाल विकास विभाग मालवण सिंधुदुर्ग व पंचायत समिती मालवण यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, गटशिक्षणाधिकारी श्री संजय माने, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, उपसभापती सतीश परूळेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी मालवण आदरणीय कौमुदी पराडकर मॅडम,सहाय्यक गटशिक्षणाधिकारी श्याम चव्हाण, तहसीलदार अजय पाटणे आदी मान्यवर उपस्थित होते. निशा हिला यावेळी सन्मानचिन्ह सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन आदरणीय कौमुदी पराडकर यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
मान्यवरांनी निशा सोलकर हिच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल विशेष कौतुक केले.निशा हिला या पूर्वी विविध पुरस्कार मिळाले आहेत.तिच्या या यशाबद्दल प्रशालेच्या वतीने अभिनंदन केले आहे..