६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा
मालवण | सहिष्णू पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा रंगलेली आहे.
यात 07 मार्चला प्रेक्षकांची उत्कंठा ताणून धरलेले, कुडाळ तालुक्यातील नेरुरच्या नागरिक बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे दोन अंकी नाटक चांडाळ चौकडी चा प्रयोग सादर झाला.
मालवणी भाषेतील हे नाटक मालवणी भूमीतीलच कुजबुज व टोमणे स्वरुपातील पण उघडपणे चर्चा न होणार्या विषयावर भाष्य करते. सखोल मांडणीची कथा, सहज पोहोचणारे संवाद आणि तरल दिग्दर्शन यांद्वारे हे नाटक रसिकांपर्यंत नुसते पोहोचतच नव्हते तर हौशी रंगभूमीकडून व्यावसायिकतेडे चक्क प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर प्रवास करत होते.
नेपत्थ्य,कला,ध्वनी व प्रकाश यांचा संयत वापर आणि मूळ कथानकातील तपशील यांचा ठेवलेला अस्सलपणा यांमुळे नाटकातील सादरीकरणातला मातीचा वास प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याचीच प्रतिक्रिया प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दिली.
या प्रयोगासाठी मालवण शहरातील साहित्यिक रुजारिओ पिंटो,ज्येष्ठ पत्रकार व नाट्य अनुभवी श्री प्रफुल्ल देसाई , नाट्य चळवळीतील श्री संजय शिंदे , रंगमंच अनुभवी व अभ्यासू श्री.विलास देऊलकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.