आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या आरोग्य जागरुकतेसाठी मोठे पाऊल..!
मालवण | नझ़िरा शेख़ : मालवणात ग्लोबल रक्तवीरांगना सिंधुदुर्गच्या वतीने ‘८ मार्च’ रोजी विशेष उपक्रमाद्वारे साजरा केला जात आहे. या उपक्रमाद्वारा महिलादिन साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या संसारिक जबाबदाऱ्या बजावत असताना स्वतःच्या आरोग्यासाठी ही जागरूक करणे आहे.
रक्तदानासाठी महिलांचा आकडा पुरुषांपेक्षा खूप कमी येतो खूपदा मनात तीव्र इच्छा असून ही कधी हिमोग्लोबिन लेव्हल कमी,ब्लडप्रेशर हाय,लो,तर थायरॉईड मुळे रक्तदान करू शकत नाही असेच दिसून येत तर कधी रक्तदानाची भीती ही कारण दिसून येतात.पण प्रत्येक घरात जेव्हा एक स्त्री आई,बायको,बहीण जेव्हा रक्तदाती असते त्या घरातील प्रत्येक कुटुंब सदस्य रक्तदाता असतो आणि हिच काळाची गरज आहे.आता प्रत्येक वेळी रक्त घ्यावं लागतं आता रक्तदान करण्यात ही स्त्री पुढाकार घेईल. हाच उद्देश घेऊन ग्लोबल रक्तदाते परिवारातील सर्व रक्तवीरांगणा मिळून स्वपुढाकार घेऊन ८ मार्च महिला दिन दिवशी सकाळी ८ ते ९ या वेळेत
‘श्री.स्वामी समर्थ ब्लड कलेक्शन,कोळंब’ यांच्या संयुक्त विद्यमाने सवलतीच्या दरात थायरॉईड टेस्ट कॅम्प आयोजनही केले गेले आहे. जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमाचा लाभ करुन घेऊन हा कॅम्प यशस्वी करण्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ,सौ.माधुरी मेस्त्री नेमळेकर (8605334487/8624891614),
सौ.नेहा कोळंबकर (9404920366), सौ.राधा केरकर
(8552833784) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत ग्लोबल रक्तवीरांगना मालवण आयोजित फेसबुक लाईव्हचेही आयोजन केले आहे.
या लाईव्हमध्ये डॉ.गार्गी गौरव ओरसकर बंदरकर(मालवण,सिंधुदुर्ग आहारतज्ञ व आरोग्य मार्गदर्शक,
फिटनेस कोच) महिलांसाठी डाएट मार्गदर्शन,महिलांचे हिमोग्लोबिन वाढीसाठी हेल्थ मार्गदर्शन,लग्ना अगोदर थॅलेसेमिया मायनर टेस्टची आवश्यकता,रक्तदान जनजागृती या विषयांवर संवाद साधणार आहेत.
८ मार्च ठीक संध्याकाळी ६.वाजता खालील फेसबुक लिंकवरुन हे मार्गदर्शन पहाता येईल.
https://www.facebook.com/globalraktdatekokanmaharashtra
ग्लोबल रक्तवीरांगना मालवण व हॉटेल मालवणी कोळंब यांच्या संयोजनाने आणि ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग, ग्लोबल मालवणी सामजिक संस्था ,ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांच्या सौजन्याने संपन्न होणार्या या उपक्रमाला सर्वांनी जास्तीतजास्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन सौ.नेहा कोळंबकर, सौ.माधुरी मेस्त्री-नेमळेकर, सौ.राधा केरकर आणि संयोजकांनी केले आहे.