26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

कुडाळ प्रांताधिकारी सौ. वंदना खरमाळे यांनी जपली माणुसकी……! (विशेषवृत्त )

- Advertisement -
- Advertisement -

चिंदर | विवेक परब (विशेषवृत्त) : मालवण तालुक्यातील चिंदर येथील कु. दुर्गा श्री प्रसाद म्हापसेकर या मुलीची काही महिन्यांपूर्वी नवोदय विद्यालय सांगेलीला निवड झाली. तिला प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सेन्टर बोर्ड ओ. बी. सी प्रमाणपत्र आवश्यक होते. तिच्या वडिलांचा जन्म कोल्हापूर येथे तर आई सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता वास्तव्यास आहे. त्यामुळे तिला नवोदय विद्यालय परीक्षा पास होऊन सुद्धा जात प्रमाणपत्र कुठून द्यावे, यावर खूप काथ्याकूट झाला. तिच्या आईच्या सिंधुदुर्ग – कोल्हापूर _सिंधुदुर्ग अशा खूप फेर्याही झाल्या. त्यात एस.टी. बंद आणि परिस्थिती अगदी बेताची असल्याने हे सगळं करताना तिची दमछाक झाली.

अशावेळी तिच्या आईने भाजप मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्याकडे आपली व्यथा मांडली. श्री.धोंडी चिंदरकर यांनी मालवण नायब तहसीलदार मालवणकर यांच्याशी चर्चा केली. परंतु तिचे प्रमाणपत्र इकडे मिळणार नाही कोल्हापूरला संपर्क करा असे सल्ला मालवणकर यांनी दिला.

कोल्हापूर इथे संपर्क केला तर तिथून प्रमाणपत्र व कागदपत्रांचा चेंडू मालवणलाच मिळेल असा टोलावला खेला.
ह्या द्विधेत असलेल्या आईची संपूर्ण घालमेल झाली आणि आपल्या मुलीला पूर्वपरीक्षा पास होऊनही जात वैधता प्रमाणपत्रामुळे प्रवेश मिळणार नाही अशी अवस्था झाली.

अखेर श्री.धोंडी चिंदरकर यांनी कुडाळ प्रांताधिकारी सौ. वंदना खरमाळे यांची भेट घेऊन यावर मार्ग काढण्याची विनंती केली. प्रांताधिका-यांनी तात्काळ मालवण तहसील यांच्याशी संपर्क साधत सगळ्या कायदेशीर बाबी तपासून प्रशासकीय जबाबदारी पाळत थेट कोल्हापूर प्रांत यांच्याशी संपर्क करून सगळी माहिती त्यांना दिली आणि सगळ्या गोष्टी तात्काळ मार्गी लागल्या.
एका मुलीला न्याय मिळाला. त्यासाठी नवोदय विद्यालयचे प्रिन्सिपल पाटील व दिलीप भोजणे यांनी विशेष सहकार्य केले. त्या मुलीला तिथे दाखल होता आले.
अशाप्रकारे एका अधिका-याने आपली जनतेप्रती व शिक्षणाप्रती प्रशासकीय जबाबदारी पाळत माणुसकीचे दर्शन घडवल एवढं सहकार्य केल्याने त्यांची लोकासेवाधिष्ठीत कार्यप्रणालीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशंसा होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चिंदर | विवेक परब (विशेषवृत्त) : मालवण तालुक्यातील चिंदर येथील कु. दुर्गा श्री प्रसाद म्हापसेकर या मुलीची काही महिन्यांपूर्वी नवोदय विद्यालय सांगेलीला निवड झाली. तिला प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सेन्टर बोर्ड ओ. बी. सी प्रमाणपत्र आवश्यक होते. तिच्या वडिलांचा जन्म कोल्हापूर येथे तर आई सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता वास्तव्यास आहे. त्यामुळे तिला नवोदय विद्यालय परीक्षा पास होऊन सुद्धा जात प्रमाणपत्र कुठून द्यावे, यावर खूप काथ्याकूट झाला. तिच्या आईच्या सिंधुदुर्ग - कोल्हापूर _सिंधुदुर्ग अशा खूप फेर्याही झाल्या. त्यात एस.टी. बंद आणि परिस्थिती अगदी बेताची असल्याने हे सगळं करताना तिची दमछाक झाली.

अशावेळी तिच्या आईने भाजप मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्याकडे आपली व्यथा मांडली. श्री.धोंडी चिंदरकर यांनी मालवण नायब तहसीलदार मालवणकर यांच्याशी चर्चा केली. परंतु तिचे प्रमाणपत्र इकडे मिळणार नाही कोल्हापूरला संपर्क करा असे सल्ला मालवणकर यांनी दिला.

कोल्हापूर इथे संपर्क केला तर तिथून प्रमाणपत्र व कागदपत्रांचा चेंडू मालवणलाच मिळेल असा टोलावला खेला.
ह्या द्विधेत असलेल्या आईची संपूर्ण घालमेल झाली आणि आपल्या मुलीला पूर्वपरीक्षा पास होऊनही जात वैधता प्रमाणपत्रामुळे प्रवेश मिळणार नाही अशी अवस्था झाली.

अखेर श्री.धोंडी चिंदरकर यांनी कुडाळ प्रांताधिकारी सौ. वंदना खरमाळे यांची भेट घेऊन यावर मार्ग काढण्याची विनंती केली. प्रांताधिका-यांनी तात्काळ मालवण तहसील यांच्याशी संपर्क साधत सगळ्या कायदेशीर बाबी तपासून प्रशासकीय जबाबदारी पाळत थेट कोल्हापूर प्रांत यांच्याशी संपर्क करून सगळी माहिती त्यांना दिली आणि सगळ्या गोष्टी तात्काळ मार्गी लागल्या.
एका मुलीला न्याय मिळाला. त्यासाठी नवोदय विद्यालयचे प्रिन्सिपल पाटील व दिलीप भोजणे यांनी विशेष सहकार्य केले. त्या मुलीला तिथे दाखल होता आले.
अशाप्रकारे एका अधिका-याने आपली जनतेप्रती व शिक्षणाप्रती प्रशासकीय जबाबदारी पाळत माणुसकीचे दर्शन घडवल एवढं सहकार्य केल्याने त्यांची लोकासेवाधिष्ठीत कार्यप्रणालीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशंसा होत आहे.

error: Content is protected !!