डॉ.प्रथमेश सावंत यांच्या स्वखर्चातून उभारणी.
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दिगवळे स्वयंभु मंदिर येथे शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख डॉ.प्रथमेश सावंत यांनी स्वखर्चाने हायमास्टची उभारणी केली असून काल शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत हायमास्टचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
दोन वर्षांपूर्वी शिवसेना खासदार विनायकजी राऊत यांनी या मंदिराला हरिनाम साप्ताहानिमित्त भेट दिल्यावर हायमास्ट संदर्भात स्थानिक ग्रामस्थांना शब्द दिला होता. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खासदार निधीला कात्री लागल्यानंतर हायमास्ट उभारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र डॉ. प्रथमेश सावंत यांनी खासदार विनायक राऊत यांनी दिलेले आश्वासन स्वतः स्वखर्चातून हायमास्टची उभारणी करून पूर्ण केल्याने दिगवळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या लोकार्पण सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, डॉ. प्रथमेश सावंत, युवासेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, शिवसेना उप तालुका प्रमुख हेमंत सावंत , नाटळ उपविभाग प्रमुख शामसुंदर परब, युवासेना विभाग प्रमुख संतोष सावंत , नितीन हरमळकर, शाखाप्रमुख शामा जाधव, रुपेश गावकर, संजय आचरेकर, दिपक मटकर, माजी सरपंच दिपक मेस्त्री, माजी ग्रा.पं. सदस्य शशिकांत मेस्त्री, नाना गावडे , उत्तम मेस्त्री, चंद्रकांत कोठावळे, संतोष वाळवे, संतोष कुबल, जनार्दन गावडे , संतोष सावंत, मनोहर राणे, प्रभाकर ढवळ, गणेश ढवळ, मुन्ना तेली, सतिश परब, आदि उपस्थित होते.
या हायमास्ट उभारणी साठी दिगवळे गावचे रहिवासी शिवसेना विभाग प्रमुख आनंद आचरेकर व युवासेना विभाग प्रमुख संतोष सावंत यांनी मेहनत घेतली.