25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने वेधले कोकण आयुक्त व ग्रामविकास उपसचिव यांचे लक्ष..!

- Advertisement -
- Advertisement -

आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या शिष्टमंडळाची यशस्वी चर्चा.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमांक ५ मध्ये समावेश व्हावा व ८५ शिक्षकांची कार्यमुक्ती व्हावी , यासाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने १४ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२२ कालावधीत १० दिवस प्रदीर्घ धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सकारात्मकता दाखवत हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र शासन यांच्याबरोबर लेखी पत्रव्यवहार केला व नंतर शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंतरजिल्हा बदली हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढील पाऊल उचलताना २४ फेब्रुवारी रोजी आंतरजिल्हा बदली संदर्भात आमदार कपिल पाटील व संतोष पाताडे (जिल्हा अध्यक्ष)यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालय नवी मुंबई येथे कोकण विभागीय आयुक्त श्री.विलास पाटील व उपायुक्त(आस्थापना)श्री. गिरीश भालेराव यांच्या सोबत आंतरजिल्हा बदली संदर्भात आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नासंदर्भातील माहिती ची प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मा.विभागीय कोकण आयुक्त यांच्याशी सविस्तर चर्चा करून वस्तू स्थिती समजून घेतली व आंतरजिल्हा बदली व कार्यमुक्ती संदर्भातील कार्यवाही कोकण आयुक्त यांच्या अधिकारात नसल्यामुळे सदर विषयात निर्णय घेण्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामविकास विभागाची असल्याचे सांगितले.

त्यानंतर ग्राम विकास विभाग बांधकाम भवन मुंबई येथे नियोजित दुपारी ३ वाजता बैठक संपन्न झाली.सदर बैठकीतील चर्चेवेळी आंतर जिल्हा बदली प्रक्रिये संदर्भातील सर्व अधिकारी(मा.उप सचिव,मा. अव्वर सचिव,मा.कक्ष अधिकारी) हे सर्व अधिकारी उपस्थित होते. या चर्चेच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्या वतीने पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाची दखल घेऊन मा मुख्य कार्यकारी अधिकारी जि प सिंधुदुर्ग यांनी मा.उपसचिव यांच्याकडे मागविलेल्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने मा. आमदार कपिल पाटील यांनी सन २०१८ पासूनच्या पत्राच्या आधारे सिंधुदुर्ग जिल्ह्याची रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा कमी कशी आहे हे पुराव्यासह निदर्शनास आणून दिले.मा.उपसचिव व संबंधित अधिकारी यांच्याशी झालेल्या सखोल चर्चेअंती आंतर जिल्हा बदली टप्पा क्र ५ चा समावेश व कार्यमुक्ती संदर्भात तात्काळ योग्य व सकारात्मक मार्गदर्शन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सिंधुदुर्ग यांना देण्यात येईल असे आश्वासन मा.उपसचिव यांनी मा.आमदार कपिल पाटील व सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्या शिष्ट मंडळाला दिले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष तथा सर्व शिक्षक भारतीच्या शिलेदारांचे प्रेरणास्थान असे श्री.संतोष पाताडे व वेंगुर्ला तालुका अध्यक्ष श्री.वसंत गर्कळ तसेच आंतरजिल्हा बदली प्रतीनिधी श्री. शिवाजी पाळवदे आणि श्री.श्रीकांत रेड्डी उपस्थित होते
यासाठी राजाध्यक्ष ,श्री नवनाथ गेंड व श्री सुभाष कार्याध्यक्ष (माध्यमिक शिक्षक भारती) यांचे मोलाचे सहकार्य लाभले,अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाताडे यांनी दिली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!