भाजप पुरस्कृत पॅनलने सर्व १३ जागा मिळवत शिवसेनेचा उडवला होता धुव्वा.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील वडाचापाट विकास सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी राजेंद्र प्रभुदेसाई यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश चिरमुले यांची निवड झाली आहे. सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी जास्तीतजास्त योजना राबविल्या जातील असे प्रतिपादन यावेळी अध्यक्ष राजेंद्र प्रभुदेसाई यांनी केले.
मागील महिन्यात झालेल्या पंचवार्षीक निवडणुकित भाजप पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवीत शिवसेना पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडविला होता. या निवडणुकीत १३ पैकी १३ जागांवर भाजप पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलने विजय मिळविला होता.
भाजप पुरस्कृत पॅनलचे प्रमुख आणि मालवणचे माजी सभापतीं राजेंद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पुरस्कुत शेतकरी सहकार पॅनलने आपला विजय प्राप्त केला होता. या शेतकरी सहकारी पॅनलचे उमेदवार राजेंद्र प्रभुदेसाई, एकनाथ पाटकर, महेंद्र हडकर, अभिमन्यु पालव, बाबुराव चिरमुले, प्रकाश चिरमुले, नामदेव वरक, स्मिता पालव, भानुदय कासले, श्रीनिवास हडकर, विजय घाडिगावकर, आंनदि पाटकर, विद्याधर तातोबा पाटकर यांनी विजय मिळवत शिवसेना पुरस्कुत पॅनलचा एकतर्फी पराभव केला.
या निवडणुकिसाठी भाजपच्या पॅनलला भाजप नेते दत्ता सामंत, अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, अनिल कांदळकर, गोळवण सरपंच सुभाष लाड, साबाजी गावडे, सोमनाथ पानवलकर, रिता वायगंणकर, शरद मांजरेकर, विरेश पवार, बिजेंद्र गावडे, आप्पा घाडीगावकर यांनी सहकार्य केले होते.
निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर, सचिन पाताडे, प्रवीण पाताडे, वैभव पालव, सचिन हडकर, समीर मुंबरकर, श्रीकांत पाटकर, रामचंद्र कासले, दीपक मांजरेकर, दया देसाई आदी ग्रामस्थ उपस्थित होते.अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राजेंद्र देसाई यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.