30.5 C
Mālvan
Monday, April 7, 2025
IMG-20240531-WA0007

पद्मश्री परशुराम गंगावणेंच्या हस्ते भारताच्या मैदानी खेळाच्या राजाचा गौरव..!

- Advertisement -
- Advertisement -

आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर मेस्त्री राष्ट्रीय कर्तृत्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. परशुराम गंगावणे यांच्या हस्ते क्रीडा, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर निःस्वार्थपणे भरीव कामगिरी करीत महाराष्ट्राचे नांव सर्वदूर करणारे भूतपूर्व फेडरेशन रेफरी तसेच स्पर्धा नियंत्रक श्री. अशोक गणेश दाभोलकर-मेस्री, दाभोली, वेंगुर्ला सिंधुदुर्ग ह्याना ” राष्ट्रीय कर्तृत्व जीवनगौरव पुरस्कार २०२२” ने सन्मानित करण्यात आले.
किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग,सह्याद्री राष्ट्रीय गड किल्ले साहित्य कला संमेलन, सिंधुदुर्ग २०२२, कार्यक्रमात सदर पुरस्कार देण्यात आला.
विश्राम पपेट थिएटर्स, कला आंगण, पिंगुळी, गुढीपूर, कुडाळ येथे संपन्न झालेल्या ह्या संमेलनात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या रत्नांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षणमहर्षी मा. प्रि. आर. एल. तांबे, जेष्ठ उद्योजक व समाजसेवक सर्वश्री. प्रकाश गायकवाड (रायगड), सुधीर जाधव ( उद्योजक, कणकवली), संतोष कदम (उद्योजक, सिंधुदुर्ग), बाळकृष्ण उर्फ दिनेश गोरे ( अध्यक्ष, पुरस्कार निवड समिती) प्रा. श्री. बी. एन. खरात ( अध्यक्ष किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग) आदी मान्यवर उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर मेस्त्री राष्ट्रीय कर्तृत्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. परशुराम गंगावणे यांच्या हस्ते क्रीडा, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर निःस्वार्थपणे भरीव कामगिरी करीत महाराष्ट्राचे नांव सर्वदूर करणारे भूतपूर्व फेडरेशन रेफरी तसेच स्पर्धा नियंत्रक श्री. अशोक गणेश दाभोलकर-मेस्री, दाभोली, वेंगुर्ला सिंधुदुर्ग ह्याना " राष्ट्रीय कर्तृत्व जीवनगौरव पुरस्कार २०२२" ने सन्मानित करण्यात आले.
किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग,सह्याद्री राष्ट्रीय गड किल्ले साहित्य कला संमेलन, सिंधुदुर्ग २०२२, कार्यक्रमात सदर पुरस्कार देण्यात आला.
विश्राम पपेट थिएटर्स, कला आंगण, पिंगुळी, गुढीपूर, कुडाळ येथे संपन्न झालेल्या ह्या संमेलनात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या रत्नांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षणमहर्षी मा. प्रि. आर. एल. तांबे, जेष्ठ उद्योजक व समाजसेवक सर्वश्री. प्रकाश गायकवाड (रायगड), सुधीर जाधव ( उद्योजक, कणकवली), संतोष कदम (उद्योजक, सिंधुदुर्ग), बाळकृष्ण उर्फ दिनेश गोरे ( अध्यक्ष, पुरस्कार निवड समिती) प्रा. श्री. बी. एन. खरात ( अध्यक्ष किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग) आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!