- ग्रामस्थांनी वेधले अनेक वर्षांच्या प्रलंबित मागणीकडे आमदारांचे लक्ष…!
बांदा | राकेश परब : मागील आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या आराखड्यात मडुरा आयनकर ते रोणापाल, पाडलोस भाकरवाडी-केणीवाडा रस्त्याचा समावेश करण्यात आला होता. परंतु कोरोना परिस्थितीमुळे रखडलेले कामाचा आता चालू आर्थिक वर्षांच्या आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी रोणापाल शाखाप्रमुख मंगेश गावडे तसेच अन्य ग्रामस्थांनी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
बांदा बाजारपेठ गाठण्यासाठी पाडलोस भाकरवाडी-सातीवनमळी तसेच रोणापाल गावातील ग्रामस्थांना या मार्गाचा वापर करावा लागतो. उर्वरीत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण न झाल्यामुळे अनेक समस्यांना तोंड देत ग्रामस्थ बाजारपेठ गाठतात. भाकरवाडी येथे एखादा व्यक्ती आजारी पडल्यास सुसज्ज रस्त्याअभावी त्यांना रुग्णालय गाठेपर्यंत अनेक अडथळे येतात. त्यामुळे आम्हाला मडुरा आयनकर, रोणापाल, पाडलोस भाकरवाडीते केणीवाडा पर्यंत रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व मोऱ्या, पूल बांधण्यासाठी रोणापाल, पाडलोस व मडुरा गावातील नागरिकांनी आमदार दीपक केसरकर व ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता सिंधुदुर्ग यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.