25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

शिवजयंती निमित्त शिवप्रेमी मित्र मंडळ ,माणिक चौकच्या वतीने टेलिव्हिजन मालिका फेम सौरभ माळवदेचा सत्कार…!

- Advertisement -
- Advertisement -

चिंदर |‍ विवेक परब : शिवजयंती निमित्त शिवप्रेमी मित्र मंडळ – माणिकचौकच्या वतीने रेकाॅर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेंगुर्ले शहरातील उदयोन्मुख कलाकार टीव्ही स्टार सौरभ माळवदे यांचा सत्कार भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
वेंगुर्ले शहरातील डुबळे गल्ली येथील रहिवासी असलेला सौरभ माळवदे यांनी अभिनयाने कोणतेही प्रशिक्षण घेतले नसताना सुद्धा आपल्या मेहनतीने व कष्टाने छोट्या छोट्या कार्यक्रमात सहभागी होऊन आजपर्यंत हा पल्ला गाठला.
घरची परिस्थिती बेताची असल्याने तसेच मुंबई मध्ये रहाणे व जेवणासाठी पैसे नसल्याने त्यावेळी वेंगुर्ले येथील खाजे, रेल्वे स्टेशनवर विकुन त्या पैशातून ऑडीशन दिली.
अभिनयाच्या जोरोवर सर्वप्रथम मालवणी सिरीयल ‘गाव गाता गजाली’ मध्ये काम करण्याची संधी मिळाली व नंतर एका पाठोपाठ एक बाळु मामा , स्वराज्य जननी जीजामाता , जिगरबाज , रंग माझा वेगळा , सावधान इंडिया FIR , जय जय स्वामी समर्थ इत्यादी नावाजलेल्या सिरीयल्समध्ये भूमिका करण्याचा मान मिळाला. या त्याच्या मेहनतीचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर लायनेस क्लबच्या नेहा यरनाळकर, प्राची मणचेकर, स्मिता कोयंडे, प्रतीक्षा मालवणकर, रुपाली पाटील, विवेक कुबल, माणिक चौक मित्रमंडळाचे नितीश कुडतरकर – रोहीत वेंगुर्लेकर -,प्रथमेश यंदे तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चिंदर |‍ विवेक परब : शिवजयंती निमित्त शिवप्रेमी मित्र मंडळ - माणिकचौकच्या वतीने रेकाॅर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेंगुर्ले शहरातील उदयोन्मुख कलाकार टीव्ही स्टार सौरभ माळवदे यांचा सत्कार भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
वेंगुर्ले शहरातील डुबळे गल्ली येथील रहिवासी असलेला सौरभ माळवदे यांनी अभिनयाने कोणतेही प्रशिक्षण घेतले नसताना सुद्धा आपल्या मेहनतीने व कष्टाने छोट्या छोट्या कार्यक्रमात सहभागी होऊन आजपर्यंत हा पल्ला गाठला.
घरची परिस्थिती बेताची असल्याने तसेच मुंबई मध्ये रहाणे व जेवणासाठी पैसे नसल्याने त्यावेळी वेंगुर्ले येथील खाजे, रेल्वे स्टेशनवर विकुन त्या पैशातून ऑडीशन दिली.
अभिनयाच्या जोरोवर सर्वप्रथम मालवणी सिरीयल 'गाव गाता गजाली' मध्ये काम करण्याची संधी मिळाली व नंतर एका पाठोपाठ एक बाळु मामा , स्वराज्य जननी जीजामाता , जिगरबाज , रंग माझा वेगळा , सावधान इंडिया FIR , जय जय स्वामी समर्थ इत्यादी नावाजलेल्या सिरीयल्समध्ये भूमिका करण्याचा मान मिळाला. या त्याच्या मेहनतीचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर लायनेस क्लबच्या नेहा यरनाळकर, प्राची मणचेकर, स्मिता कोयंडे, प्रतीक्षा मालवणकर, रुपाली पाटील, विवेक कुबल, माणिक चौक मित्रमंडळाचे नितीश कुडतरकर - रोहीत वेंगुर्लेकर -,प्रथमेश यंदे तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!