28.2 C
Mālvan
Sunday, April 6, 2025
IMG-20240531-WA0007

कुडाळात ‘आर. डब्ल्यू. जी. ट्रेडिंग कंपनी आणि माहिती अधिकार, पोलिसमित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या’ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवजयंती कार्यक्रम साजरा.

- Advertisement -
- Advertisement -

सावंतवाडी तालुकासचिवपदी ज्येष्ठ पत्रकार श्री. विष्णू चव्हाण यांची नियुक्ती..!

चौके | अमोल गोसावी : ‘आर.डब्ल्यू.जी.ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड सिंधुदुर्ग’ आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेशी संलग्न असलेल्या ‘माहिती अधिकार, पोलिसमित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या’ वतीने कुडाळ येथील कार्यालयात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री. विष्णू चव्हाण यांची संघटनेच्या सावंतवाडी तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचे अधिकृत पत्र संघटनेच्या वतीने या संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. राजेश सूर्यकांत माने, जिल्हाध्यक्षा सौ. राजश्री गावडे व सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री. प्रसाद मडगांवकर यांच्या हस्ते श्री. विष्णू चव्हाण यांना प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेशी संलग्न असलेल्या माहिती अधिकार, पोलिसमित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. राजश्री गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री. प्रसाद मडगांवकर, सावंतवाडी तालुकासचिव श्री. विष्णू चव्हाण, यांच्यासह श्री. सतीश पाटकर, श्री. विष्णू परब, ऋतुजा मेस्त्री , श्री. अनिकेत मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे पालन करत, या संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मानवी हक्कांचे संरक्षण करणे, माहिती अधिकार चळवळ गतिमान करणे, पत्रकारांच्या हक्कांचे रक्षण करणे तसेच विविध योजनांसाठी प्रयत्नशील राहण्यासाठी जागरूकता करणे, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचत त्यांच्या हक्क व कर्तव्यांबाबत जनजागृती करत, गरजूंना मोफत विधी सहाय्य सल्ला देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवत प्रयत्नशील राहण्याचे मनोगत उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सावंतवाडी तालुकासचिवपदी ज्येष्ठ पत्रकार श्री. विष्णू चव्हाण यांची नियुक्ती..!

चौके | अमोल गोसावी : 'आर.डब्ल्यू.जी.ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड सिंधुदुर्ग' आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेशी संलग्न असलेल्या 'माहिती अधिकार, पोलिसमित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या' वतीने कुडाळ येथील कार्यालयात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री. विष्णू चव्हाण यांची संघटनेच्या सावंतवाडी तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचे अधिकृत पत्र संघटनेच्या वतीने या संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. राजेश सूर्यकांत माने, जिल्हाध्यक्षा सौ. राजश्री गावडे व सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री. प्रसाद मडगांवकर यांच्या हस्ते श्री. विष्णू चव्हाण यांना प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेशी संलग्न असलेल्या माहिती अधिकार, पोलिसमित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. राजश्री गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री. प्रसाद मडगांवकर, सावंतवाडी तालुकासचिव श्री. विष्णू चव्हाण, यांच्यासह श्री. सतीश पाटकर, श्री. विष्णू परब, ऋतुजा मेस्त्री , श्री. अनिकेत मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे पालन करत, या संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मानवी हक्कांचे संरक्षण करणे, माहिती अधिकार चळवळ गतिमान करणे, पत्रकारांच्या हक्कांचे रक्षण करणे तसेच विविध योजनांसाठी प्रयत्नशील राहण्यासाठी जागरूकता करणे, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचत त्यांच्या हक्क व कर्तव्यांबाबत जनजागृती करत, गरजूंना मोफत विधी सहाय्य सल्ला देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवत प्रयत्नशील राहण्याचे मनोगत उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!