रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम.
चिंदर / विवेक परब : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवारी ८ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर तर्फे होममिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम येणाऱ्या 32 स्पर्धक महिलांना प्रवेश देण्यात येणार आहे. सहा फेर्या मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक फेरीसाठी आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत. सदर बक्षिसे सौ. उर्मिला सांबारी, रचना जोशी, सीमा घुटूकडे, वैशाली सांबारी, स्मिता परब, सुमित्रा गुरव, श्रीमती शोभा सुखटणकर, यशोधन गवस, कुलसुम नर्सरीचे सौरभ राणे, यांनी प्रायोजित केली असून उपविजेत्या होममिनिस्टर ला सिकँफे आचरा सरपंच प्रणया टेमकर यांच्या कडून सोन्याची नथ तर विजेत्याला साईसमर्थ कलेक्शनच्या भावना मुणगेकर यांच्या कडून सेमी पैठणी देण्यात येणार आहे. या स्पर्धेला उपस्थित स्पर्धकांसाठीही प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून अचूक उत्तरे देणार्या प्रेक्षकांसाठी मानसी राणे, गीता खेडेकर यांच्या कडून आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. अशेष पेडणेकर आणि सौ मृणालिनी आचरेकर यांच्या कडून उपस्थितांसाठी अल्पोपहारही देण्यात येणार आहे. नावनोंदणी रविवार पाच जून सायंकाळी चार वाजेपर्यंत असून अधिक माहिती साठी ग्रथपाल विनिता कांबळी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी व कार्यवाह अर्जुन (दादा) बापर्डेकर यांनी केले आहे.