नगरसेविका तृप्ती मयेकर संकल्पीत आणि नगरसेविका सेजल परब व नगरसेवक पंकज सादये यांच्या प्रयत्नांना भरीव प्रतिसाद..!
मालवण | विनीत मंडलिक : मालवण शहरातील प्रभाग 8 मधील आणि वायरी हिंदळेकर वाडा, भरडेवाडा, लुडबेवाडा व मेस्त्री वाडी या भागातील 100 % लसीकरण करण्यासाठी वायरी गर्दे रोड येथील शांताराम निवास या ठिकाणी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात या भागातील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

यावेळी नागरिकांकडून या उपक्रमाबद्दल नगरसेविका तृप्ती मयेकर यांच्यासह नगरसेवक पंकज सादये व नगरसेविका सेजल परब यांचे आभार मानले गेले.

सरकारी हॉस्पिटल कर्मचारी मिलिंद चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांचेही नागरिकांनी विशेष धन्यवाद व्यक्त केले.