ताज्या बातम्या
नाशिकवासियांची प्रतिक्षा संपली..! जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये २७ ऑक्टोबर रोजी ‘कायाकल्प' उपक्रम. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विद्युत रोहीत्र लोकार्पीत. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी - मराठा जात प्रमाणपत्र पडताळणीचा आढावा. मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचा ॲथलीट कु. सोहम चव्हाण याची विभागीय स्पर्धेच्या पात्रतेची 'उंच उडी...!' सामाजिक जाणीवेसह कवी मनाचे उपक्रमशील शिक्षक मनोहर बसवंते यांचा २५ ऑक्टोबर रोजी नांदेड आकाशवाणीवर कार्यक्रम. प्रिया मयेकर यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान. तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या व तक्रारींच्या निराकरणासाठी गठीत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची आढावा बैठक संपन्न. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक तालुक्यात विरंगुळा केंद्र सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. 'दुकानदारांनो सावधान...!'
निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी - मराठा जात प्रमाणपत्र पडताळणीचा आढावा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी - मराठा जात प्रमाणपत्र पडताळणीचा आढावा.

निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी - मराठा जात प्रमाणपत्र पडताळणीचा आढावा.

Article image


सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी - मराठा जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यास पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने गठित समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २३ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडली. या बैठकीत जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेतील विविध प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष उपेंद्र तामोरे, समिती सदस्य विशाल नाईक, सदस्य सचिव तुषार गवळी, दक्षता पथकाच्या पोलीस उपअधीक्षक प्रतिक्षा खेमनाळकर आणि पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील उपस्थित होते.


बैठकीत कुणबी, मराठा - कुणबी आणि कुणबी - मराठा प्रवर्गातील प्राप्त अर्ज, वितरित करण्यात आलेली जात प्रमाणपत्रे, नामंजूर प्रस्ताव, दक्षता पथकाकडे प्रलंबित असलेले प्रस्ताव तसेच समिती स्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.


कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथील उपविभागीय कार्यालयांकडून जून २०२६ नंतर तपासण्यात आलेले नवीन अभिलेख, त्यामध्ये आढळलेल्या अतिरिक्त नोंदी, या नोंदींच्या आधारे नागरिकांकडून विहित नमुन्यात प्राप्त झालेले अर्ज, वितरित प्रमाणपत्रे आणि प्रलंबित अर्जांची सद्यस्थिती याबाबतही माहिती घेण्यात आली.


जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आणि विहित कालमर्यादेत पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्या. पात्र नागरिकांच्या अर्जांवर नियमांनुसार कार्यवाही करून प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली काढण्यावर बैठकीत भर देण्यात आला. बैठकीत संबंधित कार्यालयांमधील अभिलेख तपासणी, अर्जांची स्थिती, प्रमाणपत्र वितरण आणि प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्याबाबत आढावा घेण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स