ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
किल्ले सिद्धगड येथे भाजपा मालवणच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

किल्ले सिद्धगड येथे भाजपा मालवणच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा.

किल्ले सिद्धगड येथे भाजपा मालवणच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा. 

Article image


तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी व ग्रामस्थांची उपस्थिती.

Article image

मालवण : महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन, आज ६ जून २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ओवळीये गावातील किल्ले सिद्धगड इथे भारतीय जनता पक्ष मालवणच्या वतीने उत्साहात संपन्न झाला. मालवण भारतीय जनता पक्षाच्या वतीने, ओवळीये येथील अत्यंत खडतर व दुर्गम अशा किल्ले सिद्धगडवर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपतींचा भगवा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले सिद्धगड परिसर दुमदुमला. 


Article image

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी छत्रपतींच्या दुर्गम, दुर्लक्षित गडकिल्ल्यांचे महत्व आणि त्याचे संवर्धन यासाठी भाजपा पक्ष प्रयत्नशील असल्याचे सांगितले आणि त्या माध्यमातून परिसराचा विकास सुद्धा शक्य आहे. किल्ल्याची सुरक्षा तथा संवर्धन याबाबत धोंडी चिंदरकर यांनी विशेष अधोरेखित करताना, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायणराव राणे, आमदार निलेश राणे, मंत्री आशिष शेलार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना याबाबत माहिती दिली जाईल व या किल्ल्यासाठी विकासाची दिशा निश्चित केली जाईल असे स्पष्ट केले.  


Article image

यावेळी बोलताना ओवळीये सरपंच रंजना पडवळ यांना ह्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा केला गेला त्यामुळे राज्याच्या पटलावर किल्ले सिद्धगडचे नांव ठळकपणे येत असल्याचा आनंद व्यक्त केला. सरपंच रंजना पडवळ यांनी या कार्यक्रमात सहभागी सर्वांचे आभार मानले.


यावेळी भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र चव्हाण, ओवळीये सरपंच सौ. रंजना पडवळ, किर्लोस सरपंच सौ. साक्षी चव्हाण, हिवाळे सरपंच रघुनाथ धुरी, रामगड सरपंच शुभम मठकर, नांदोस उपसरपंच विजय निकम, पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, योजना कांबळी, माधुरी मसुरकर, किर्लोस ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगावकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, माजी उपसभापती अरुण मेस्त्री, उद्योजक बाबा आंगणे, शक्ती केंद्र प्रमुख बंडू गावडे, माजी बांधकाम व वित्त सभापती तथा जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र चव्हाण तसेच किल्ले सिद्धगड सरदार वंशज बाळा सावंत, विविध शिवप्रेमी, बाल शिवाजीची वेषभूषा केलेले बालक आणि ओवळीये व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन.

लोकप्रिय टॅग्स