ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवणात रिक्षा व्यावसायिक बांधवांचा गरजू महिला रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक हातभार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात रिक्षा व्यावसायिक बांधवांचा गरजू महिला रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक हातभार.

मालवणात रिक्षा व्यावसायिक बांधवांचा गरजू महिला रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक हातभार.

Article image


मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणात जवळपास ७८ रिक्षा चालकांनी दांडी येथील एका गरजू महिला रुग्णाला तिच्या शस्त्रक्रियेसाठी २२ हजार २०० रुपये जमवत आर्थिक मदतीचा हातभार लावला आहे. सौ. रविना रविंद्र रेवंडकर असे त्या ४५ वर्षीय गरजू महिला रुग्णाचे नाव असून तिचे पती रविंद्र रेवंडकर यांनी या संदर्भात मदतीची याचना करून विविध माध्यमांतून आवाहन केले होते. या आवाहनाला रिक्षा व्यावसायिक बांधवांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल रिक्षा व्यावसायिक निलेश लुडबे यांनी विशेष समाधान व्यक्त केले आहे. या मदतीच्या वेळी रिक्षा व्यावसायिक बांधव निलेश लुडबे यांच्यासह ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक पप्पू कद्रेकर, बाबू हडकर, गणेश लुडबे, जयेंद्र उर्फ नानू सावजी, प्रवीण उर्फ मुन्ना मिठबावकर उपस्थित होते. 


सौ. रविना रविंद्र रेवंडकर व कुटुंबीय हे मोलमजुरीवर अवलंबून असतात. सौ. रविना ह्या गृहिणी असून त्यांच्या पोटात गाठ आहे आणि फुफ्फुसात पाणी झाले आहे तसेच त्या उपचारासाठी कणकवली येथे डाॅ. बिरमोळे यांच्याकडे २६ मे पासून दाखल आहेत. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी जवळपास '१ लाख ५० हजार' ( दिड लाख) रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती रिक्षा व्यावसायिक निलेश लुडबे यांनी दिली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी रिक्षा व्यावसायिक बांधव श्री. निलेश लुडबे यांच्याशी 9404737708 या क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स