ताज्या बातम्या
लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...! मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
लोकसंवाद आणि जनसेवेचा अविरत प्रवास.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

लोकसंवाद आणि जनसेवेचा अविरत प्रवास.

लोकसंवाद आणि जनसेवेचा अविरत प्रवास.

Article image


मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर वाढदिवस विशेष.



विशेष : मालवण शहराच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर आपल्या अष्टपैलू कार्यकर्तृत्वाने स्वतंत्र ठसा उमटवणारे मालवणचे लोकप्रिय उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा आज, २ जून रोजी वाढदिवस. मालवण बाजारपेठेतील एक पारंपरिक आणि नामांकित किराणा मालाचे व्यापारी म्हणून परिचीत असलेल्या दीपक पाटकर यांनी बालपणापासूनच थेट 'लोकसंवादाचे' बाळकडू घेतले आहे. व्यापारी वर्गातील त्यांचे संस्कार आणि थेट जनतेशी जोडलेली नाळ यामुळेच त्यांचा राजकीय प्रवास यशस्वी ठरला आहे.


राणे परिवाराची प्रेरणा आणि ज्येष्ठ नेतृत्वाचे 'सटीक' मार्गदर्शन


उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाला ज्येष्ठ नेत्यांच्या विचारांची आणि प्रेरणेची मोठी जोड मिळाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायणराव राणे, सामाजिक जाणकार सौ. नीलमताई राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे या राणे परिवारातील सर्वच सदस्यांकडून त्यांना जनसेवेची मोठी प्रेरणा मिळाली. याशिवाय, ज्येष्ठ राजकीय व सामाजिक व्यक्तिमत्त्व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे दीपस्तंभीय मार्गदर्शन आणि आमदार कालिदास कोळंबकर यांची स्फूर्ती यामुळे पाटकर यांची राजकीय वाटचाल अधिक प्रगल्भ होत गेली. या सर्व थोर नेत्यांच्या तत्त्व, व्यक्ती आणि सामर्थ्याच्या जाणीवा शिदोरी म्हणून जपत त्यांनी शहराचे नगरसेवक, बांधकाम सभापती आणि आता विद्यमान उपनगराध्यक्ष पदापर्यंतचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.



व्यापारी संस्कार आणि तत्पर सेवाभाव.


सात्विक व पारंपरिक तरिही नाविन्याची व्यापारी पार्श्वभूमी असल्यामुळे लोकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या समस्या समजून घेणे हा त्यांचा सहज स्वभाव बनला. ग्राहकांना आणि जनतेला तत्पर सेवा देण्याचे जे संस्कार त्यांच्यावर नकळत होत गेले, त्याचेच प्रतिबिंब आज त्यांच्या राजकीय कार्यपद्धतीत आणि बोलण्यात प्रकर्षाने जाणवते. राजकारणात आल्यानंतरही त्यांनी आपल्यातील साधेपणा आणि सेवावृत्ती कायम ठेवली आहे.


'कार्यकर्ता' हेच सर्वोच्च बिरूद


दीपक पाटकर यांचे एक स्पष्ट मत आहे की, राजकीय पटलावर 'कार्यकर्ता' हेच सर्वोच्च बिरूद आहे. पदापेक्षा जनतेची कामे करणाऱ्या कार्यकर्त्याला ते अधिक महत्त्व देतात. त्यांच्या याच भूमिकेला मालवणच्या जनतेचा दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे. शहराच्या अनेक अबोल आणि वंचित घटकांच्या समस्या जाणून घेऊन, त्यांना मदतीचा प्रकाश स्रोत दाखवण्याचे काम पाटकर नेहमीच करत आले आहेत.

त्यांच्या याच नित्य नूतन कार्यपूर्तीमुळे ते आज जनमानसात आदराचे स्थान मिळवून आहेत.


अध्यात्म आणि कौटुंबिक आशिर्वाद व साथ.


राजकारण प्रवेश केल्यानंतर दीपक पाटकर यांची अध्यात्मिक वृत्ती अधिक कणखर झाली. दीपक पाटकर यांनी त्यांच्या मातृ व पितृ कृपाशिर्वाद यांना 'प्रापंचिक जीवनात' सर्वोच्च कृतज्ञतेने जपलेले आहे असे ते आवर्जून सांगतात. भाऊ, बहिण, पत्नी, मुलगा यांच्या नात्यांची विण दिवसेंदिवस अधिक दृढ़ होत गेली. जनसेवेच्या इच्छेला घरचा निरंतर पाठिंबा असल्याचाही आनंद ते सदैव व्यक्त करतात.


अशा या कार्यक्षम, लोकाभिमुख आणि संवेदनशील नेतृत्वाला म्हणजेच उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून, राजकीय वर्तुळातून आणि जनतेकडून सदिच्छा आणि हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स