ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
आडारी ग्रामस्थांकडून वैभव नाईक यांचा भव्य सत्कार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आडारी ग्रामस्थांकडून वैभव नाईक यांचा भव्य सत्कार.

आडारी ग्रामस्थांकडून वैभव नाईक यांचा भव्य सत्कार.

Article image

आडारी येथे सभामंडपासाठी माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून २० लाखाचा निधी.



ब्यूरो न्यूज  :  मालवण तालुक्यातील आडारी येथील श्री गणेश मंदिर येथे सभामंडप बांधण्यासाठी माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी २० लाख रुपयाचा निधी दिला आहे. त्याबद्दल आडारी येथील ग्रामस्थांनी काल संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून वैभव नाईक यांना श्री गणेश मंदिर येथे निमंत्रित करून शाल श्रीफळ देऊन त्यांचा भव्य सत्कार केला व त्यांचे आभार मानले. याप्रसंगी वैभव नाईक म्हणाले, मी आज आमदार नाही परंतु आडारी येथील ग्रामस्थांना जो शब्द दिला होता तो मी पूर्ण केला आहे. येथील ग्रामस्थांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे.माझ्या आमदारकीच्या काळात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यकर्त्यांनी देखील त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आपण सर्व ग्रामस्थ मिळून श्री गणेश मंदिराची पुनर्बांधणी करीत आहात, हे कौतुकास्पद आहे. आपण सर्वानी अशीच एकजूट कायम ठेवावी असे त्यांनी सांगितले. 


यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, नगरसेवक मंदार ओरसकर, नगरसेवक तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, तालुकाप्रमुख दीपा शिंदे, माजी नगरसेविका पूजा करलकर, युवतीसेना प्रमुख निनाक्षी मेथर, युवासेना शहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर, अमोल वस्त, उमेश मांजरेकर, मनोज मोंडकर, बंड्या सरमळकर, उमेश चव्हाण, चिंतामणी मयेकर, गणेश चव्हाण, रुपा कुडाळकर, सौ. सरमळकर, सदाशिव गावकर, शिवराम गावकर, सुदर्शन गावकर, योगेंद्र (पप्या) गावकर, भूषण गावकर, राकेश गावकर, दिनेश मुंबरकर, राजेश मुंबरकर, बाळू फाटक, चंद्रकांत कामतेकर, स्वरा कामतेकर, चंद्रकांत जैतापकर, श्रीराम (नाना) गावकर, संजय गावकर, गणेश गावकर, सुजान गावकर, वैभव गावकर, आरंभ गावकर, निखिल करलकर, आदित्य कांबळी, विघ्नेश शिरोडकर, रमाकांत फाटक, मयुरेश फाटक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चि...

29 Sep 2026 201

लोकप्रिय टॅग्स