28.5 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

शिक्षकांचे दातृत्वाने वसतीगृहातील मुले गेली भारावून..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळा नांदगांव मधलीवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रावणी जावकर, श्रीमती मानसी मोरये, तसेच सावडाव खलांत्रीच्या श्रीमती ममता सावंत यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ओझरम येथील शालेय मुलांच्या वसतिगृहात प्रत्यक्ष भेट देऊन केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका परब मॅडम, पदवीधर शिक्षक विनायक जाधव, पतपेढी संचालक आनंद तांबे, संतोष सातोसे आदी मान्यवर उपस्थित होते.
ओझरम येथील मुलांच्या वसतिगृहात राजेश गुरव, वृद्धांली गुरव, ऐश्वर्या फाले, साहिल फाले, देवेंद्र कोळापटे, वैष्णवी जगताप आदी कोल्हापूर, फणसगाव, राजापूर परिसरातील मुलांचा येथील श्रीमती तारामती हरिश्चंद्र सावंत या अतिशय कष्ट घेऊन सांभाळ करतात. त्यांच्या या महान कार्याला सर्व शिक्षकांनी सलाम केला. तसेच ओझरम नंबर एक चे सर्व शिक्षक या मुलांसाठी अनेकदा दाते मिळवून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. ओझरम गावचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश उर्फ बंडू राणे या मुलांच्या सेवेत अहोरात्र मेहनत घेतात. त्यांच्या सामाजिक कारकिर्दीला सर्व शिक्षक वृंद यांनी सदिच्छा दिल्या.आभार आनंद तांबे यांनी मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळा नांदगांव मधलीवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रावणी जावकर, श्रीमती मानसी मोरये, तसेच सावडाव खलांत्रीच्या श्रीमती ममता सावंत यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ओझरम येथील शालेय मुलांच्या वसतिगृहात प्रत्यक्ष भेट देऊन केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका परब मॅडम, पदवीधर शिक्षक विनायक जाधव, पतपेढी संचालक आनंद तांबे, संतोष सातोसे आदी मान्यवर उपस्थित होते.
ओझरम येथील मुलांच्या वसतिगृहात राजेश गुरव, वृद्धांली गुरव, ऐश्वर्या फाले, साहिल फाले, देवेंद्र कोळापटे, वैष्णवी जगताप आदी कोल्हापूर, फणसगाव, राजापूर परिसरातील मुलांचा येथील श्रीमती तारामती हरिश्चंद्र सावंत या अतिशय कष्ट घेऊन सांभाळ करतात. त्यांच्या या महान कार्याला सर्व शिक्षकांनी सलाम केला. तसेच ओझरम नंबर एक चे सर्व शिक्षक या मुलांसाठी अनेकदा दाते मिळवून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. ओझरम गावचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश उर्फ बंडू राणे या मुलांच्या सेवेत अहोरात्र मेहनत घेतात. त्यांच्या सामाजिक कारकिर्दीला सर्व शिक्षक वृंद यांनी सदिच्छा दिल्या.आभार आनंद तांबे यांनी मानले.

error: Content is protected !!