श्री सोमेश्वर कलामंचातर्फे शिवजयंतीसाठी उपक्रम
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : श्री.सोमेश्वर कलामंचातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा व मुंबई येथून विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गराजलो रे गराजलो या नाट्यचळवळीद्वारा होतकरु स्थानिक कलाकारांना व तंत्रज्ञांना संधी देणार्या या मंचाने आता शिवजयंती निमित्त दिनांक 16 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.
शिवजयंती निमित्त श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित, आपल्या कलाकारांमधील कलागुणांना वाव मिळावा,त्यांच्यात धीटपणा यावा,आपले विचार श्रोत्यांसमोर प्रभावी पुणे मांडता यावे, त्यांच्यातील व त्यांच्यातील कलेचा आत्मविश्वास वाढावा अशा विविध उद्देशाने ऑनलाईन वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.तरी सर्व कलाकारांनी संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन श्री.सोमेश्वर कला मंचचे अध्यक्ष श्री.सहदेव धर्णे आणि टीम गराजलो रे गराजलो यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर ‘शिवचरीत्र एक संस्काराचा भाग,भावी पिढीसाठी गडसंवर्धन,मी शिवाजीराजे भोसले बोलतोय,छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन,आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज असते तर..?’ यापैकी एका विषयावर आठ ते दहा मिनिटे बोलून त्याचा मोबाईल आडवा धरुन रेकाॅर्डेड व्हिडिओ दिनांक 16 फेब्रुवारी पर्यंत पाठवायचा आहे.
16 फेब्रुवारी ही व्हिडिओ स्विकारायची अंतिम तारीख आहे.सदर व्हिडिओ श्री.कुशल मिशाळे 9011474329 या वाॅटस् अप क्रमांकावर पाठवायचा आहे.
प्रत्येक स्पर्धक फक्त एकच संपूर्ण व्हिडिओ पाठवू शकतो ही महत्वाची अट असून निकाल हा संपूर्ण परिक्षकांचा अंतिम निर्णय असेल.
विजेत्यांना सन्मानपत्र देऊन गौरविले जाणार आहे.
इच्छुक कलाकार आणि वक्त्यांनी जास्तीतजास्त संख्येने या संधिचा लाभ घेऊन स्वतःला सिद्ध करावे असे आवाहन श्री सोमेश्वर कलामंचचे सर्वेसर्वा श्री सहदेव धर्णे यांनी केले आहे.