कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीतील संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांना पोलीसांनी अटक केल्यानंतर वातावरण चिघळले आहे. आरोप प्रत्यारोप यांच्या फैरी झडत असतानाच शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रम येथे आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे.

“आप्पा साहेब आम्हाला क्षमा करा” असे म्हणत गुन्हेगारी प्रवृत्तीचा आमदार निवडून दिला याच प्रायश्चित म्हणून आपण आत्मक्लेश आंदोलन करत असल्याचे पारकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी संदेश पारकर यांच्यासोबत अनेक युवक व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
