शिरगांव | संतोष साळसकर : प्रगत सिंधुदुर्ग मुंबई तसेच श्रीम.मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे झी टीव्ही संचलित सा रे ग म प लिटलचॅम्प 2021 ची प्रथम क्रमांक विजेती कु.गौरी गोसावी हिचा सत्कार करण्यात आला,तसेच त्यांच्या पालकांचाही संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी यांचे घरी गौरविण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव मोहन रणसिंग, सचिव संदीप साळसकर, भाऊ पारकर,पाट हायस्कुलचे संचालक दत्ता साळगावकर, सामंत सर, रेडकर सर, व इतर मान्यवर उपस्थित होते. तर सायंकाळी चौधरी यांचे घरी, गौरीच्या पालकांना सीमा चौधरी, रेश्मा साळसकर, मीनाक्षी चौधरी, ममता आडेकर यांचे हस्ते गौरविण्यात आले. यावेळी दत्ता,साळगांवकर, संदीप साळसकर दयानंद चौधरी,हेही उपस्थित होते. तसेच संस्थामार्फत जिल्ह्यातील आरोग्य केंद्राना ‘सी’ व्हिटामीनच्या गोळ्या व स्यानिटायझरच्या बाटल्या, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलीपे यांचेकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कांबळे, संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी, उपाध्यक्ष, पांडुरंग गावडे, सचिव मोहन रणसिंग, संदीप साळसकर, भाऊ पारकर,व इतर मान्यवर उपस्थित होते
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -