उपसभापती राजू परुळेकर व भाजप विभागीय अध्यक्ष प्रशांत परब यांचा पुढाकार.
चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील गोठणे येथील भाजी उत्पादक आणि वितरक महिला यांना मालवण पंचायत समिती उपसभापती श्री राजू परुळेकर, भाजप विभागिय अध्यक्ष श्री प्रशांत परब: यांच्या हस्ते बी बियाणे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला गोठणे सरपंच, सौ. श्रेया चव्हाण, उपसरपंच राजू लाड, माजी सरपंच घनःशाम चव्हाण ,दया हाटले, तुषार हाटले, शैलेश चव्हाण, शैलेश लाड, महादेव सावंत व भाजी उत्पादक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भाजीपाला बी-बियाणे उपलब्ध करून दिल्याबद्दल उपसभापती राजू परुळेकर व विभागीय अध्यक्ष प्रशांत परब व इतर सहका-यांनी प्रयत्न केला. उत्पादक-वितरक महिलांकडून सर्वांचे आभार मानण्यात आले.