26.6 C
Mālvan
Tuesday, April 8, 2025
IMG-20240531-WA0007

चिंदरच्या सडेवाडीतील नाथ गोसावी युवक मंडळाचे अनुदानासाठी सामाजिक भान..!

- Advertisement -
- Advertisement -

चिंदर | विवेक परब (विशेषवृत्त ): भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व टेसा टेप्स (इं) प्रा. लि. यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक २० शाळांतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ई-लर्निंग च्या माध्यमातून शिक्षणाचा लाभ घेता यावा या करिता ४३ इंच स्मार्ट एल. ई. डी. टि. वी. वितरीत करण्याचे आयोजित करण्यात आले. टि.वी. ची एकंदरीत किंमत रु. २६४००/- इतकी होती. चिंदर ,सडेवाडी येथील नाथ गोसावी युवक मंडळाच्या वतीने “ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय , वायंगणी” शाळेची सदर अनुदाना करीता निवड होण्या करिता प्रयत्न करण्यात आला. त्या प्रयत्नांना यश येऊन शाळेची अनुदानासाठी निवडही केली गेली.
भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या नियमावली नुसार अंदाजे २०% म्हणजे रु. ५०००/- एवढी रक्कम शाळांनी जमा करावयाची होती व उर्वरित रक्कम भगिरथ संस्था व टेसा टेप्स (इं)प्रा.लि. कंपनी मार्फत भरून टि.वी. प्रदान करण्यात येणार होता.
ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी शाळेची रक्कम रु. ५०००/- ही आपल्या नाथ गोसावी युवक मंडळ चिंदर सडेवाडी यांच्या वतीने अदा करण्यात आली व सदर शाळेस स्मार्ट टि.वी. अनुदानित करण्यात आला.
नाथ गोसावी युवक मंडळाचे अध्यक्ष श्री. योगेश गोसावी व सचिव श्री. मंगेश गोसावी यांनी शाळेची व मुख्याध्यापक शिक्षकांची भेट घेऊन टि. व्ही.संचाची पहाणी करून त्याचा लाभ शिक्षणासाठी सर्व विद्यार्थ्यांना व्हावा अशी इच्छा व्यक्त केली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. टकले सर यांनी नाथ गोसावी युवक मंडळ चिंदर सडेवाडी आणि भगिरथ प्रतिष्ठान व टेसा टेप्स यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली व नाथ गोसावी युवक मंडळाला आभार प्रदर्शनाचे पत्र दिले.
सर्वांना सोबत घेऊन सामाजिक विकास साधण्याची नाथ गोसावी युवक मंडळ ,सडेवाडी चिंदरची क्रियाशील परंपरा त्यांच्या शैक्षणिक योगदानातूनही सुरु राहील्याने या युवक मंडळाची प्रशंसा होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चिंदर | विवेक परब (विशेषवृत्त ): भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व टेसा टेप्स (इं) प्रा. लि. यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक २० शाळांतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ई-लर्निंग च्या माध्यमातून शिक्षणाचा लाभ घेता यावा या करिता ४३ इंच स्मार्ट एल. ई. डी. टि. वी. वितरीत करण्याचे आयोजित करण्यात आले. टि.वी. ची एकंदरीत किंमत रु. २६४००/- इतकी होती. चिंदर ,सडेवाडी येथील नाथ गोसावी युवक मंडळाच्या वतीने "ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय , वायंगणी" शाळेची सदर अनुदाना करीता निवड होण्या करिता प्रयत्न करण्यात आला. त्या प्रयत्नांना यश येऊन शाळेची अनुदानासाठी निवडही केली गेली.
भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या नियमावली नुसार अंदाजे २०% म्हणजे रु. ५०००/- एवढी रक्कम शाळांनी जमा करावयाची होती व उर्वरित रक्कम भगिरथ संस्था व टेसा टेप्स (इं)प्रा.लि. कंपनी मार्फत भरून टि.वी. प्रदान करण्यात येणार होता.
ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी शाळेची रक्कम रु. ५०००/- ही आपल्या नाथ गोसावी युवक मंडळ चिंदर सडेवाडी यांच्या वतीने अदा करण्यात आली व सदर शाळेस स्मार्ट टि.वी. अनुदानित करण्यात आला.
नाथ गोसावी युवक मंडळाचे अध्यक्ष श्री. योगेश गोसावी व सचिव श्री. मंगेश गोसावी यांनी शाळेची व मुख्याध्यापक शिक्षकांची भेट घेऊन टि. व्ही.संचाची पहाणी करून त्याचा लाभ शिक्षणासाठी सर्व विद्यार्थ्यांना व्हावा अशी इच्छा व्यक्त केली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. टकले सर यांनी नाथ गोसावी युवक मंडळ चिंदर सडेवाडी आणि भगिरथ प्रतिष्ठान व टेसा टेप्स यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली व नाथ गोसावी युवक मंडळाला आभार प्रदर्शनाचे पत्र दिले.
सर्वांना सोबत घेऊन सामाजिक विकास साधण्याची नाथ गोसावी युवक मंडळ ,सडेवाडी चिंदरची क्रियाशील परंपरा त्यांच्या शैक्षणिक योगदानातूनही सुरु राहील्याने या युवक मंडळाची प्रशंसा होत आहे.

error: Content is protected !!