मसुरे | प्राजक्ता पेडणेकर (विशेषवृत्त): एखाद्या व्यक्तिच्या गुणांची कदर जर दोनचार वृत्तपत्र तथा पोर्टलवर येत असेल तर ती बातमी…जर असे सलग दोनचार महिने घडत असेल तर ती कामगिरीची विशेष दखल …आणि जर पत्रकारसंघ मिळुनच जर सर्वानुमते त्या व्यक्तिचा पत्रकारदिनी गौरव करत असेल तर ती “वैभवशाली” असण्याची लोकशाहीची पावती…..!
मसुरे गांवची कन्या आणि कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज बारावी सायन्स ए डिव्हिजन ची विद्यार्थिनी वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिचा विशेष सत्कार सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने सावंतवाडी येथे करण्यात आला.गेली दोन वर्षामध्ये विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये तसेच कला क्रीडा शेत्रामध्ये घवघवीत यश संपादन करून कोकणा सहित संपूर्ण राज्यामध्ये वैभवी हिने नावलौकिक मिळविला आहे. वैभवी च्या या कामगिरी बद्दल तिचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने वैभवी पेडणेकर चे विशेष कौतुक करण्यात आले.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभवी चा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, बबन साळगावकर, मराठी पत्रकार परिषद राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र रावराणे, जिप समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, संतोष वायंगणकर, सतीश पाटणकर, ई लय गो चे संस्थापक जयवंत गवस, सिंधुदुर्ग लाईव्ह व कोकण साद चे एडिटर इन चीफ सागर चव्हाण, प्रवीण मांजरेकर,उमेश तोरसकर,राजेश मोंडकर, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, सतीश पाटणकर, विद्याधर परब, मंगेश तळवणेकर, अनिल निरवडेकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार संतोष सावंत, देवयानी वरसकर, आणि जिल्ह्यातील दिग्गज नेते मंडळी सह जिल्ह्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.
उण्यापुर्या एकोणीस वयाची असणारी वैभवी पेडणेकर एक उदात्त सामाजिक नवयुवक उदाहरण असल्याचेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचे मत आता जाहीर झाले आहे. असा पत्रकारांनी गौरवलेला वैभवशाली स्तंभ भविष्यात लोकशाहीतील पहिल्या तीन स्तंभातून काम करु लागला तर तेही सामाजिक वैभवच असेल असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तज्ञ समाज अभ्यासकांचे मत आहे.