*चिंदर | विवेक परब :* बहुचर्चित व चुरशीच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत संचालक म्हणून विजयी झालेले श्री. बाबा परब यांचे माजी खासदार भाजप नेते प्रदेश सचिव निलेश राणे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बाबा परब यांनी आपल्या कार्यकक्षातील संस्थाना अधिक सक्षम बनवण्याकडे लक्ष द्यावे. सहकारातून विकासाचे पर्व घडवावे अशा शब्दात पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कुडाळ भाजप कार्यालय येथील सत्कार कार्यक्रमात कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे, ओबीसी मोर्चा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. दिपलक्ष्मी पडते, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, जिल्हा कार्यकारीणी सदस्य आनंद शिरवलकर, शहर अध्यक्ष राकेश कांदे, माजी सरपंच कुडाळ प्रशांत राणे, प्रज्ञा राणे, सौ साक्षी सावंत, आबा धडाम, अभि गावडे, राजेश पडते, रीना पडते, सुधीर चव्हाण, सौ रेवती राणे, चांदणी कांबळी, निलेश परब, चंदन कांबळी आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.