कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): देवगड जामसंडे नगरपंचायतचे नगरसेवक निरज घाडी यांचे वडील गणपत सोनू घाडी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.माजी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक असलेल्या गणपत घाडी हे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त होते.क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज संस्थेचे सिंधुदुर्ग विभागाचे ते सल्लागार होते. त्यांना भजनाची आवड लहानपणापासूनच होती.
वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच त्यांनी भजन कला आत्मसात करून ती आयुष्यभर जोपासली होती.देवगड तालुका भजन मंडळाचे ते अध्यक्ष होते. भजनात स्वरचित काव्ये रचून ती सादर करण्यात त्यांचा हातखंडा होता. दिर्बादास या नावाने ते काव्य रचत असत .त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुली , दोन मुलगे ,सुना,जावई,नातवंडे असा परीवार आहे. मृत्यूसमयी ते 76 वर्षांचे होते . त्यांच्या निधना बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.