मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इयत्ता पाचवी ते सातवी गटामध्ये कणकवली तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कु.आर्या किशोर कदम हिने प्रथम क्रमांक पटकावून सुयश प्राप्त केले
कणकवली तालुकास्तरीय स्पर्धा पंचायत समिती कणकवली च्या सभागृहात संपन्न झाल्या. वक्तृत्व स्पर्धे साठी माझा देश माझा अभिमान हा विषय ठेवण्यात आला होता .या मध्ये एस एम हायस्कुल कणकवलीच्या आर्या किशोर कदम हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिला गरगटे मॅडम, तायशेट्ये मॅडम, वर्ग शिक्षक केंद्रे सर यांनी विशेष मार्गदर्शन केले .
आर्याने यापुर्वी अनेक ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. तिच्या या उज्वल यशाबद्दल संस्था अध्यक्ष, मुख्याध्यापक, दर्पण प्रबोधनी चे अध्यक्ष राजेश कदम, सचिव आनंद तांबे, कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष संदिप कदम, सचिव विकास वाडीकर यांनी अभिनंदन करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनंदन.