29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

भारत सरकार मॅट्रिकेतर शिष्यवृती प्रलंबित अर्जाची छाननी प्रक्रिये बाबत आवाहन.

- Advertisement -
- Advertisement -

ओराेस / प्रतिनिधी : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी सन 2011-12 ते 2017-18 या कालावधीतील महाविद्यालय स्तरावर स्कॉलरशिपचे तांत्रिक त्रुटीमुळे प्रलबंधित असलेले अर्जाचा प्रस्ताव 9 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावित असे आवाहन दीपक घाटे सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण फी परीक्षा फी योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, विजाभज इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी सन 2011-12 पासून Mahaeschol या ऑनलाईन प्रणालीमार्फत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात होता. ही ऑनलाईन प्रणाली सन 2017-18 या आर्थिक वर्षापासून शासन स्तरावरुन बंद केली आहे. प्रणालीवरील सन 2011-12 ने 2016 -17 या कालावधीत तांत्रिक त्रुटी असल्यामुळे प्रलंबित असलेले अर्ज सन 2017-18 मधील Mahaeschol या ऑनलाईन प्रणालीमध्ये नुतनीकरण केलेले मात्र देयक न निघाल्यामुळे प्रलंबित असणारे अर्ज तसेच सन 2017-18 मधील प्रथम वर्षास असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज ज्या महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयकडे अद्यापही सादर केलेले नाहीत अथवा सादद केलेले आहे. परंतु एखादा विद्यार्थी राहून गेलेला आहे. अशा महाविद्यालयांनी प्रस्ताव या कार्यालयास 9 डिसेंबर2021 पर्यत सादर करावित. जिल्ह्यातील महाविद्यालयांना कार्यालयाकडून वारंवार झालेल्या बैठकीव्दारे Google Meet या ऑनलाईन प्रणालीवरुन होणाऱ्या बैठकामध्ये , कार्यालयांकडून वारंवार केलेला प्रत्रव्यवहार याव्दारे अर्ज सादर करण्यातबाबत सूचना करण्यात आले आहे. सन 2011-2012 ते सन 2017-18 या कालावधीतील प्रलंबित प्रस्ताव करण्यासाठी ही अखेरची मुदत देण्यात येत आहे. महाविद्यालयाचे प्रस्ताव विहीत वेळेत कार्यालयास सादर करावेत. प्रस्ताव सादर न केल्यास व या कालावधीतील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!