कणकवली | उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ):रक्तदान क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या आणि संपूर्ण सिंधुदुर्गात रक्तदान अवयवदान देहदान व रुग्णमित्र चळवळ उभी केल्याने ‘बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशन’ महाराष्ट्र यांचा राष्ट्रीय पुरस्कार 2021 तासगाव येथे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला प्रदान करण्यात आला.सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच गोवा, बेळगाव, मुंबई,पुणे वा उर्वरीत महाराष्ट्रातही रक्तसेवा दिली आहे, बॉम्बे ब्लड ग्रुप या अत्यंत दुर्मिळ रक्तगटाचे सर्वाधीक दाते शोधण्याचे कामही संस्थेने केले आहे, या जागतिक दुर्मिळ रक्तगटाचे दाते आज प्रतिष्ठानकडे आहेत, आवश्यकतेनुसार ते जिल्हा राज्यच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही रक्तदान करु शकतात, प्रतिष्ठानने ही “बॉम्बे ब्लड ग्रुप” रक्तदाते शोध मोहिम सातत्याने सुरु ठेवली आहे. या सर्व कार्याची दखल घेवुन बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशनने प्रतिष्ठानला राष्ट्रीय पुरस्काराचे मानपत्र देवून सन्मानीत केले आहे.यावेळी सुधीर कांबळी व सपना पडवळ या बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तदात्यांनाही नॅशनल अॕवॉर्डने सन्मानित करण्यात आले.सांगली तासगाव येथील सोहळ्यात देशातील २२ राज्यातील संस्था व व्यक्तींना हा पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातून कार्यकर्ते उपस्थित होते, त्याच प्रमाणे बिहार, राजस्थान, छत्तीसगड, खांडवा,जम्मु, पंजाब, हिमाचल प्रदेश, हैदराबाद तेलंगणा,सहारनपुर उत्तर प्रदेश, इत्यादी २२ राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक विक्रम यादव,धनंजय कुलकर्णी,चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे, तहसीलदार रवींद्र रांजणे, माय लॅबडिस्कवरी सोल्युशन चे श्रीकांत पाटोळे, पोलीस अधीक्षक अश्विनी शेंगडे, संजीव कुलकर्णी , मनोज इंगळकर सर आणि अमोल पवार सर उपस्थित होते.हा पुरस्कार सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे, जिल्हा सल्लागार उद्धव गोरे, जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्तदाते सुधीर कांबळी व सपना पडवळ, तसेच संस्थेचे रक्तमित्र रामदास मालवणकर या टीमने स्वीकारला.या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रतिष्ठानचे अभिनंदन करण्यात येत आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी सर्व टिमचे व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -
अभिनंदन.