बांदा : राकेश परब : एच.आई.व्ही संसर्गाच्या प्रसाराबाबत जनजागृती करण्यासाठी आणि या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूची कारणे सर्वाना समजावण्यासाठी नुकताच कोकण कला व शिक्षण विकास संस्थेमार्फत मुंबई येथे जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला.
एचआयव्ही/एड्सच्या निर्मूलनासाठी भारत सतत प्रयत्नशील आहे. एड्स नावाच्या या भयंकर आजाराने देशातील मोठ्या लोकसंख्येला आपल्या प्रभावाखाली घेतले आहे. एचआयव्हीशी संबंधित प्रकरणे पूर्णपणे काढून टाकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि गेल्या काही वर्षांत भारताला या प्रयत्नात अंशत: यश मिळाले आहे. भारताला “पूर्णपणे एड्समुक्त” होण्यासाठी बराच वेळ लागेल कारण देशात अजूनही १५ ते ४९ वयोगटातील लोक एड्सने बाधित आहेत.
कोकण संस्थेने या आजाराबाबत जनजागृतीसाठी मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एड्स आणि लैंगिक शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले.
एड्स होऊ नये म्हणून खबरदारी घेणे हाच उपाय असल्याने सर्वांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला. या प्रसंगी एच.आय. व्ही संसर्गाच्या लोकांशी एकता आणि जागरूकता यावी यासाठी सर्वानी हातात लाल रिबन बांधली होती.मुंबई दादरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात साक्षी पोटे, स्वाती नलावडे, अक्षय ओवळे सह तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्तृत उपक्रम. अभिनंदन.