प्रतिनिधी : कुडाळ येथे ९ मार्च रोजी, आधार कन्सल्टन्सी व फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्गच्या वतीने ‘निवेदन व भाषण कला प्रशिक्षण शिबिर’ आयोजीत करण्यात आले आहे. हे एकदिवसीय शिबीर हाॅटेल लेमन ग्रास, कुडाळ येथे सकाळी ९ ते ७ वेळेत संपन्न होईल. या प्रशिक्षणाचे मूल्य रुपये २,५००/_ ( दोन हजार पाचशे रुपये) असून अधिक माहितीसाठी ॲड. नंदन वेंगुर्लेकर ( मोबाईल क्र. ९४२२४३४३४६) यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे. भाषण कलेने आपला प्रभाव वाढवावा तसेच भाषण कौशल्याचा विकास करणे हे या शिबिराचे प्रमुख उद्देश आहेत.

श्री राजेश सावंत( निवेदक व प्रेरक वक्ता, इन्फो मोटीव्ह) आणि श्रीम. सुमन केळुसकर ( प्रशिक्षक व निवेदिका, विश्वमंगल स्किल्स एज्युकेशन) हे या शिबिराचे प्रशिक्षक आहेत. शिबिरातील कार्यशाळा ही थिअरी व प्रॅक्टीकल स्वरुपात असून प्रत्यक्षात अनुभव घेतल्यावर शिबिराचा हा एक दिवस अविस्मरणीय ठरेल असे ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितले असून शिबिरात जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. शिबिरात प्रवेश मर्यादित असून प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.