मसुरे | प्रतिनिधी : फेस्कॉन सलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ हडी च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ९ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत जठारवाडी शाळा नंबर २ येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये डायबिटीस, अस्थमा, हिमोग्लोबिन, थायरॉईड याची मोफत तपासणी वतीने करण्यात येणार आहे. यावेळी माधवबाग येथील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून तपासणी करणार आहेत. शिबिरामध्ये आयुर्वेदिक औषधे मोफत देण्यात येणार आहेत. शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने करण्यात आले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -