मालवण | ब्यूरो न्यूज : सुप्रसिद्ध उद्योजक श्री दत्ता सामंत यांनी अष्टपैलू कलानिकेतन संस्थेच्या कार्याची विशेष प्रशंसा केली. गेली चौदा वर्षे ‘अष्टपैलू कलानिकेतन’ संस्थेमार्फत जिल्हास्तरीय सवेष, साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन करून या भागातील सांस्कृतिक चळवळीला पुढे नेण्याचे जे काम करीत आहे ते कौतुकास्पद आहे आपणाकडून नेहमीच सांस्कृतिक व कलागुणांना वाव व प्रोत्साहन देणाऱ्या अष्टपैलू कलानिकेतन’ सारख्या संस्थेच्या कार्यात आपला पाठिंबा राहील असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक दत्ता सामंत यांनी एका कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी केले. सुप्रसिद्ध नाटककार कै. राम गणेश गडकरी स्मृतिप्रीत्यर्थ मालवण येथील ‘अष्टपैलू कलानिकेतन’ संस्थेमार्फत जिल्हास्तरीय सवेष, साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा तसेच जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. १ मार्च रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी श्री दत्ता सामंत बोलत होते. यावेळी श्री. दीपक पाटकर व मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून प्रा. वैभव खानोलकर, परीक्षक संजय धुपकर, शेखर पणशीकर, भाई शेवडे, संस्थाध्यक्ष भालचंद्र केळुसकर, सचिव हरी चव्हाण, सुनील परुळेकर, अभय कदम, विलास देउलकर, बाळू काजरेकर, संजय गावडे उपस्थित होते.
प्रारंभी प्रसिद्ध उद्योजक श्री. दत्ता सामंत यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. संस्थाध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. यावेळी नाट्य कलावंत निर्मला टिकम यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्र सरकारचे नोटरी ऍड. दिलीप ठाकूर, मजदूर संघ राज्य सचिव हरी चव्हाण तसेच दीपक पाटकर, बलराम सामंत, संजय केळुसकर, अभिमन्यू पांचाळ व बाळा आचरेकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. वैभव खानोलकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समृद्ध कला क्षेत्राचा परिचय व त्याविषयीचा वाटणारा अभिमान याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. यावेळी गत वर्षातील संस्थेचे दिवंगत हितचिंतक, आश्रयदाते तसेच संगीत क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
आभार प्रदर्शन हरी चव्हाण यांनी केले तर सुत्रसंचालन विनोद सातार्डेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील परुळेकर, अभय कदम, विलास देउलकर, कुणाल वराडकर, गजानन मांजरेकर, हेमंत आचरेकर, बाळू काजरेकर, गरिमा काजरेकर, प्रथमेश सामंत, रत्नाकर सामंत, सुधीर कुर्ले व सर्व संस्था सदस्यांचा हातभार लागला.