मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद अपंग निधीचे वितरण नुकतेच केले गेले आहे. या नीधीबाबत काहीजण श्रेयाचे राजकारण करत असल्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्त्ते माजी नगरसेवक मंदार केणी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.
मंदार केणी यांनी साल २०१७ -१८ पासूनच्या नगरपरीषद अंपंग निधी विवरण पत्राचा दाखला देत म्हणले आहे की, मालवण नगरपरिषद हा अपंग निधी २०१७-१८ पासून प्रामाणिक पणे देत आहे. विधानसभेपूर्वीचा काळ हा केवळ आचारंसहिता असल्याने नगरपरिषला हा निधी देता आला नव्हता. आचारसंहिता संपताच तो वितरित केला गेला. परंतु त्यानंतर हा निधी आपल्यामुळे मिळाला असे काही लोक अभास निर्माण करत आहेत. यात आपल्याला यात राजकारण करायचं नाही. पण लोकांना सत्यता समजणे गरजेचे आहे असे सांगत आता लोकांना शाश्वत विकास दाखवा आणि श्रेय घ्या असेही माजी नगरसेवक मंदार केणी यांनी सांगितले आहे.
मंदार केणी यांनी प्रसिद्धीपत्रासोबत जोडलेले विवरण पत्र
