प्रतिनिधी : मुंबई कांदिवली येथील चिल्ड्रन्स ॲकॅडमी शाळेची इयत्ता नववीतील विद्यार्थीनी व बालसाहित्यिका कु. आदिती भालचंद्र पुजारे हिला जेईसी पब्लिकेशन्स संस्था पुरस्कृत २०२४ च्या लिडींग अटेननर्स ॲवाॅर्ड मधील ‘बडिंग रायटर ऑफ द इअर’ तसेच इंटरनॅशनल आयकाॅन ऑफ द इअर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

जेईसी पब्लिकेशन्स संस्थेच्या वतीने लेखनातील चिकाटी तसेच सातत्य, इच्छाशक्ती व प्रयोगशीलेसाठी अटेननर्स ॲवाॅर्डच्या माध्यमातून पुरस्कार दिला जातो. कु. आदिती भालचंद्र पुजारेच्या २०२४ सालच्या बडिंग रायटर ऑफ द इअर पुरस्कर प्राप्तीच्या यशानंतर कु. आदिती आणि चिल्ड्रन्स ॲकॅडमी शाळा, शिक्षक, पालक यांचे अभिनंदन होत आहे.
