२० नोव्हेंबर रोजीचा काळसे ग्रामपंचायत समोर रास्ता रोको ग्रामस्थांनी केला रद्द…!
चौके | अमोल गोसावी : बहुचर्चित, बहुप्रतीक्षित तसेच प्रवासासाठी,मार्गावरील ग्रामस्थांसाठी व पादचाऱ्यांसाठीही खडतर असा नेरुरपार कुडाळ रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा २० नोव्हेंबर रोजी काळसे ग्रामपंचायत समोर रास्ता रोको करणार असा इशारा काळसे धामापूर मधील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला ३० ऑक्टोबर रोजी दिला होता. या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने चार दिवसांपूर्वी नेरुरपार कुडाळ रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी लागणारे साहित्य रस्त्याकडेला टाकले असून काही ठिकाणी खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात झालेली दिसत असल्याने काळसे धामापूर ग्रामस्थांनी २० नोव्हेंबर रोजी जाहीर केलेले रास्ता रोको आंदोलन रद्द केले आहे. फक्त खड्डे बुजवण्याचे काम आणि रस्त्याची डागडुजी चांगल्या दर्जाची व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
(फोटो: संग्रहीत)