मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील नांदोस लोकडेवाडीतील भाजप मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेलेल्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व शिवसेना उपनेते संजय आग्रे उपस्थिती होती. यावेळी संतोष साटविलकर, दीपा सावंत, दादा नाईक उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली निलेश राणे यांना विजयी करायचा निर्धार प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विजेंद्र गावडे, बाबू गावडे जितेंद्र गवस प्रमोद पार्टे, मदन पावस्कर, रुपेश परब, महेश पावसकर राजू गावडे, दशरथ चव्हाण, देवेंद्र चव्हाण, अंकुश खोत, प्रसाद थवी, बाळ्या बांदेकर, रोशन खोत, सिद्धेश पार्टे, प्रसाद पार्टे, प्रकाश खोत यांनी प्रवेश केला